8th Pay Commission : 2014 मध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आणि त्याच्या समितीची स्थापना करण्यात आली. समितीची स्थापना झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच एक जानेवारी 2016 ला नवीन सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो आणि घोषणा झाल्यानंतर साधारणता वेतन आयोग लागू होण्यास दोन ते अडीच वर्षांचा काळ लागत असतो.
दरम्यान 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच आठव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आठवा वेतन आयोग लागू होण्यास 2027 च वर्ष उजाडणार अशा चर्चा सुरू आहेत.

पण असे असतानाच आता मीडिया रिपोर्ट मध्ये यावेळी आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कमी दिवसांचा वेळ घेतला जाईल असे म्हटले जात आहे. साधारणता घोषणा झाल्यापासून नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी दोन ते अडीच वर्षे लागतात पण आठवा वेतन आयोग फक्त दोनशे दिवसांमध्ये लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
8व्या वेतन आयोगाबाबतचे नवे अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाबाबत नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. वेतन आयोगाच्या निर्मितीसाठी आणि कामकाजासाठी 35 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व पदे प्रतिनियुक्तीद्वारे भरण्यात येणार आहेत.
अर्थातच या पदांवर अनुभवी लोकांना नियुक्त केले जाणार असून पदावर नियुक्त व्यक्ती वेतनासंबंधीतच कामकाज करणार आहे. तसेच आठवा वेतन आयोग स्थापनेपासून ते आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंतच या नियुक्त लोकांना या पदावर ठेवले जाणार आहे यानंतर ही पदे रद्द केली जाणार आहेत.
दरम्यान, शासनाच्या निर्णयामुळे आता लवकरच अथवा वेतन आयोगाच्या समितीचे कामकाज सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे यावर्षी दोनशे दिवसातच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी शक्य असल्याचा दावा होतोय.
अजून आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य ठरलेले नाहीत पण हे काम लवकरच होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने कर्मचाऱ्यांचा तपशील जाहीर केला असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत जेवढे वेतन आयोग लागू झाले आहेत ते सर्व वेतन आयोग लागू करण्यासाठी घोषणेनंतर दोन ते अडीच वर्षांचा वेळ लागलाय.
पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवावेतन आयोग हा एकमात्र आयोग राहणार आहे जो की घोषणा झाल्यापासून अवघ्या दोनशे दिवसांच्या काळात म्हणजेच एका वर्षापेक्षा कमी दिवसाच्या काळात लागू होण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल होणार आहे तसेच एचआरए अर्थात घर भाडे भत्ता आणि टीए वाहतूक भत्त्यात सुद्धा बदल होऊ शकतो.
या व्यतिरिक्त, पे मॅट्रिक्समध्ये सध्याच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत एकूण 18 स्तर तयार करण्यात आले आहेत, पण नव्या आठव्या वेतन आयोगात त्यापैकी काही विलीन देखील होऊ शकतात. तथापि आठव्या वेतन आयोगात नेमक्या काय शिफारशी अन तरतुदी असतील हे नव्या आयोगाचा रिपोर्ट समोर आल्यानंतरच क्लिअर होणार आहे.