8th Pay Commission लागू झाल्यानंतर कोणाला किती पगार ? समोर आली मोठी अपडेट; शिक्षक, क्लर्क, शिपाईचे पगार किती ? पहा…

वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. पण नव्या वेतन आयोगात आता फिटमेंट फॅक्टर सुद्धा वाढणार आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढेल असे बोलले जात आहे.

Published on -

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. खरे तर गेल्या वर्षी, अगदीच लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून आठवा वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी निवडणुकीच्या काळात सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने आठवा वेतन आयोगाची घोषणा करणार असे बोलले जात होते.

मात्र तसे काही घडले नाही पुढे अर्थसंकल्पात तरी असा निर्णय होईल असे वाटत होते मात्र त्यावेळी सुद्धा केंद्रातील सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. शिवाय सरकारकडून सातत्याने लोकसभेत आणि राज्यसभेत सरकार दरबारी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले जात होते.

मात्र अचानक 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारी कर्मचारी संघटनांकडून जी मागणी उपस्थित केली जात होती ती मागणी सरकारने अखेर कार मान्य केली असून येत्या काही दिवसांनी आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर मग ही समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिफारशी सुचवणार आहे.

त्याआधीच मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढणार याबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. आता आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर क्लर्क शिपाई शिक्षक सह सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पगार किती रुपयांनी वाढू शकतात याचे गणित थोडक्यात समजून घेणार आहोत.

किती वाढणार पगार

वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू असून या सध्याच्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे.

पण नव्या वेतन आयोगात आता फिटमेंट फॅक्टर सुद्धा वाढणार आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढेल असे बोलले जात आहे. नक्कीच फिटमेंट फॅक्टरमध्ये जर असे झाले तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा सध्या 18 हजार रुपये आहे पण तो नव्या वेतन आयोगाच्या आगमनानंतर थेट 51 हजार 480 रुपये होईल. मात्र याबाबतचा निर्णय हा केंद्रातील सरकारकडूनच घेतला जाणार आहे.

तरीही आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो, याबाबत काय अंदाज बांधले जात आहेत याची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे जर 40 हजार रुपये असेल तर सध्याच्या सातवा वेतन आयोगानुसार त्याला 1,02,800 रुपये मिळतं असतील.

पण, आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये 11,600 रुपयांची वाढ होऊन त्या व्यक्तीचे वेतन हे (40,000 × 2.86 = 1,14,400) 1,14,400 रुपये इतके होऊ शकते. तसेच, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे 50 हजार रुपये असेल तर त्या व्यक्तीचे सध्याचे वेतन हे 1,28,000 इतके असेल.

मात्र आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 हजार रुपयांची वाढ होऊन तो पगार 1,43,000 इतके होऊ शकते. तसेच ज्यांचा सध्याचा बेसिक पगार 20,000 रुपये इतका असेल त्यांना 51,400 रुपये इतके वेतन मिळतंय, पण नवा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 20000 बेसिक पगार असणाऱ्यांना 57 हजार 200 रुपये इतके वेतन मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe