आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही का? सरकारने स्पष्टचं सांगितलं

Published on -

8th Pay Commission DA Hike : सध्या संपूर्ण देशभर नव्या आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी 2016 पासून लागू आहे आणि तो 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल.

यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात नवा आठवावेतन आयोगाचा लाभ 2028 पासून मिळणार मात्र नवा आयोग 2026 पासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना आयोगाची थकबाकी दिली जाणार आहे.

नव्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर याच कामकाज नुकताच सुरू झाल आहे. केंद्र सरकारने स्थापित केलेल्या तीन सदस्य समितीच्या माध्यमातून याचे कामकाज केले जात आहे. आठव्या वेतन आयोगाची समिती दीड वर्षात आपला अहवाल शासनाकडे जमा करणार आहे.

पण समितीचा अहवाल सरकार दरबारी जमा होण्याआधीच याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये नव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही असा दावा केला जातोय.

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शन धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून आली आहे. हा संदेश सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होतोय. या संदेशामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नवीन Finance Act 2025 नुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) होणारी वाढ बंद करण्यात येणार आहे.

तसेच वेतन आयोगाशी संबंधित फायदे रद्द केले जाणार आहेत. या दाव्यामुळे देशभरातील लाखो केंद्रीय पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आता शासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शनिवारी 13 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने या व्हायरल मेसेजची गंभीर दखल घेत तातडीने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या PIB Fact Check या अधिकृत माध्यमातून हा संदेश पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले आहे.

सरकारने केंद्रीय पेन्शनधारकांचे महागाई भत्त्याचे (DA) फायदे किंवा वेतन आयोगाशी संबंधित कोणतेही लाभ रद्द करण्यात आलेले नाहीत असे ठणकावून सांगत अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर पसरवण्यात आलेला हा दावा चुकीचा आहे अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. यासोबतच, सरकारने पेन्शन आणि निवृत्ती लाभ कधी थांबवले जाऊ शकतात, याबाबतचा गैरसमजही दूर केला आहे.

कोणत्या परिस्थितीत पेन्शन धारकांचे लाभ थांबतात 

सरकारच्या माहितीनुसार, काही अपवादात्मक परिस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ थांबवले जातात. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे DA वाढ किंवा वेतन आयोगातील सुधारणा काही विशिष्ट आणि मोठ्या गंभीर परिस्थितीत थांबवल्या जाऊ शकतात.

जर एखाद्या कर्मचाऱ्याला गैरशिस्त, गंभीर गैरवर्तन किंवा शिस्तभंगाच्या कारणास्तव निलंबित किंवा बडतर्फ करण्यात आले असेल, तर अशा कर्मचाऱ्यांचे काही निवृत्ती लाभ रोखले जाऊ शकतात. तसेच, CCS (Pension) Rules, 2021 मधील नियम 37 मध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबतही सरकारने स्पष्टता दिली आहे.

या नियमानुसार, सार्वजनिक उपक्रमात विलीन झालेल्या कर्मचाऱ्याला जर गैरशिस्तीच्या कारणास्तव बडतर्फ करण्यात आले, तरच त्याचे निवृत्ती लाभ रोखले जातील. मे 2025 मध्ये जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेतही हेच स्पष्ट करण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News