8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नव्या वेतन आयोगाबाबत म्हणजेच आठव्या वेतन आयोगाबाबत आहे. खरे तर जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये याची घोषणा केली होती.
आता आठवा वेतन आयोग मंजूर झाला असून नव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. जेणेकरून संदर्भ अटी (TOR) अंतिम करता येतील आणि संभाव्य आयोग सदस्यांच्या कामाच्या सुरुवातीच्या पद्धती अंतिम करता येतील अन नियोजित वेळेत हा वेतन आयोग लागू करता येईल.

तथापि, सरकारने अद्याप आयोगाच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. खरंतर, आठवा वेतन आयोगासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर सुमारे 35 पदे भरण्याच्या सरकारच्या प्रस्तावाची माहिती देणारे एक परिपत्रक गेल्या महिन्यात जारी करण्यात आले होते.
तसेच ही पदे भरण्यासाठी पात्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून अर्ज सुद्धा मागविण्यात आले होते. तेव्हापासून, माध्यमांमध्ये टीओआर अंतिम करण्याबद्दल आणि सदस्यांच्या नियुक्त्यांबद्दल अनेक वृत्ते आली आहेत. दरम्यान आता नव्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे.
खरे तर नवीन आठवावेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. अशातच, आता या तारखेला किंवा या तारखेच्या नंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
एक जानेवारी 2026 नंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार का?
खरं तर नवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे, पण प्रत्यक्षात 1 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता फारच कमीच आहे.
आता प्रश्न असा उद्भवतो की, जर एखादा कर्मचारी 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर निवृत्त झाला, परंतु तोपर्यंत आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या गेल्या नाहीत, तर त्याला लाभ मिळेल का ? तर आहे उत्तर हो.
अशा सर्व कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात वेतन सुधारणेचा लाभ देखील मिळेल. यापूर्वीही असे घडले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या वेळी सुमारे एक वर्षाचा विलंब झाला होता, परंतु सर्व कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थकबाकी देण्यात आली होती.
त्यामुळे आठव्या वेतन आयोगात सुद्धा असेच होणार आहे त्यामुळे एक जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.