आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपाईपासून ते क्लर्कपर्यंत कोणाला किती पगार मिळणार ? पहा एका क्लिकवर

सध्या देशात आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. 17 जानेवारीला केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मात्र अजून याची समिती स्थापित झालेली नाही म्हणून ही समिती कधी स्थापित होणार हा मोठा प्रश्न आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आठवा वेतन आयोगात किती असेल याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Published on -

8th Pay Commission : केंद्रातील सरकारने नुकत्यांच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. गेल्या वर्षी आठवा वेतन आयोगाची मोठी चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत आणि त्यानंतरही आठवा वेतन आयोगाबाबत सातत्याने चर्चा सुरू राहिली. पण सरकार सातत्याने आठवा वेतन आयोग स्थापनेचा कोणताच प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नसल्याचे सांगत राहिले.

अखेरकार सरकारने 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली. सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असली तरी देखील अजून यासाठीच्या समितीची स्थापना झालेली नाही. यामुळे नव्या वेतन आयोगाची समिती कधी स्थापित होणार हा मोठा प्रश्न आहे.

कारण की समितीची स्थापना झाल्यानंतर समिती सरकारला शिफारशी देणार आहे आणि याच आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी सरकार स्वीकृत करून नंतर कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग बहाल केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जात असून सध्याचा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 मध्ये लागू झाला होता. आत्तापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो यामुळे एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होईल असे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपाईपासून ते क्लर्कपर्यंत कोणाला किती पगार मिळणार? याच बाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ?

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टरनुसार ठरतो, 7 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतके होते, ज्यामुळे लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा पगार 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आला. तथापि, सध्या भत्त्यांसह एकूण पगार सुमारे 36,020 इतका येतो.

दरम्यान आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असावा याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. महत्त्वाचे म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिटिव्ह मशिनरीकडून आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून कर्मचाऱ्यांना कमीत कमी 2.86 इतके असावे अशी मागणी केली आहे.

आता समजा जर फिटमेंट फॅक्टर 2.08 वर निश्चित झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 37,440 रुपयांपर्यंत वाढू शकते. त्याच वेळी, पेन्शन 9,000 रुपयांवरून 18,720 रुपयांपर्यंत वाढू शकते. पण जर समजा फिटमेंट फॅक्टर 2.86 वर गेला तर पगार 186% वाढू शकतो. असे झाल्यास, किमान वेतन 51,480 रुपये आणि पेन्शन 25,740 रुपये वाढणार असा अंदाज आहे.

शिपाईपासून क्लर्कपर्यंत साऱ्यांचा पगार किती असणार?

आता आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपाई पासून क्लर्कपर्यंत साऱ्या कर्मचाऱ्यांचा अंदाजित पगार किती असेल हे पाहूयात. फिटमेंट फॅक्टर 2.86 इतका झाल्यास लेव्हल 1 मधील शिपाई आणि अटेंडंट यांचे वेतन 18,000 रुपयावरून वाढून 51,480 रुपये होईल.

म्हणजेच त्यांच्या पगारात 33,480 रुपयांनी वाढ होणार आहे. लेव्हल 2 मधील लोअर डिव्हिजन क्लर्कचे मूळ वेतन 19,900 रुपयांवरून 56,914 रुपये होईल. म्हणजेच या कर्मचाऱ्यांच्या पगारात 37 हजार 14 रुपयांची वाढ होईल. लेव्हल 3 मधील कॉन्स्टेबल आणि कुशल कर्मचाऱ्यांचे वेतन 21,700 रुपयांवरून 62,062 रुपयांपर्यंत वाढू शकते.

म्हणजे या नोकरदार मंडळीच्या पगारात 40,362 रुपयांची वाढ होणार आहे. लेव्हल 4 मधील ग्रेड डी स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिक यांचे सध्याचे वेतन 25,500 रुपयांवरून 72,930 रुपये होईल. अर्थातच यांचा पगार अंदाजे 47,430 रुपयांनी वाढणार आहे.

तसेच, लेव्हल 5 मधील वरिष्ठ लिपिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे वेतन 29,200 रुपयांवरून वाढून 83,512 रुपये होईल, म्हणजे या नोकरदार मंडळीच्या पगारात 54,312 रुपयांनी वाढ होणार आहे. पण हा फक्त एक अंदाज आहे. जेव्हा आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी प्रत्यक्षात स्वीकारल्या जातील तेव्हाच कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे फिक्स होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe