8th Pay Commission : केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
खरंतर आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असली तरी देखील आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्षांची आणि सदस्यांची अजून नियुक्ती झालेली नाही. मात्र या दिशेने सरकारने काम सुरू केले आहे आणि लवकरच अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

यामुळे नवा वेतन आयोग वेळेतच सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल होणार अशी शक्यता आहे. हा नवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार असे म्हटले जात आहे, त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.
पण जे कर्मचारी नव्याने शासकीय सेवेत रुजू झाले आहेत किंवा रुजू होतील त्यांच्या पगारात आठव्या वेतन आयोगामुळे किती वाढ होणार हा मोठा सवाल काही कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होतोय आणि आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत डिटेल्स ?
नवीन वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढणार आहे, खरेतर वेतन आयोगाचा मुख्य आधार हा फिटमेंट फॅक्टर राहील, जो कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी निर्णायक घटक ठरणार आहे.
सध्याच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर हा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू झाला आणि या सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता, मात्र आता नव्या वेतन आयोगात तो 2.28 ते 2.86 दरम्यान होऊ शकतो अशी शक्यता आहे.
अशा परिस्थितीत जर समजा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 हा फॅक्टर निश्चित झाला, तर सध्याचे वेतन दुपटीहून अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सध्याच्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 18 हजार रुपये एवढे बेसिक पगार निश्चित करण्यात आले आहे मात्र नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 झाले तर कर्मचाऱ्याचे वेतन 51,480 पर्यंत जाऊ शकते.
म्हणजे याचा फायदा फक्त जुन्याच कर्मचाऱ्यांना होणार असे नाही तर नव्याने नोकरीत आलेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. कारण वेतन आयोग सर्व कर्मचाऱ्यांवर समानपणे लागू होणार आहे.
यासोबतच नव्या वेतन आयोगात आणखी एक महत्त्वाचा बदल होणार आहे आणि तो म्हणजे सध्या मिळणारा 55% महागाई भत्ता थेट बेसिक पगारात ऍड केला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होणार असून, यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.