आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आर्मीच्या जवानांना किती पगार मिळणार ? पदानुसार आर्मी जवानांचा पगार किती वाढणार पहा…..

सध्याचा सातवा वेतन आयोग 2025 च्या अखेर समाप्त होईल आणि त्यानंतर नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी अपेक्षित आहे. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आर्मी जवानांचा पगार कितीने वाढणार? याबाबत आज आपण या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

8th Pay Commission : जानेवारी महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. 16 जानेवारी 2025 रोजी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. तेव्हापासूनच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहेत. खरेतर, सरकारने 8व्या वेतन आयोगबाबत जवळपास सहा महिन्यांपूर्वी घोषणा केली होती.

मात्र अद्याप आठव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष स्थापना झालेली नाही. जाणकार लोकांनी म्हटल्याप्रमाणे नव्या वेतन आयोगाची आयोगाची रचना, अहवाल तयार करणे, मंत्रिमंडळाकडून मंजुरी आणि नंतर अंमलबजावणी या सर्व बाबींसाठी आणखी किमान 12 महिने लागतील.

म्हणजेच नवा आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी 2027 उजाडण्याची शक्यता असते. दरम्यान आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार वाढणार आहे.

सैन्यात कार्यरत असणाऱ्या जवानांचा सुद्धा पगार वाढणार आहे. दरम्यान आता आपण सातव्या वेतन आयोगात आर्मीच्या जवानांना त्यांच्या पदानुसार किती पगार मिळतो आणि नव्या आठव्या वेतन आयोगात त्यांना किती पगार वाढ मिळू शकते याची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

सातव्या वेतन आयोगातील आर्मी जवानांचा पगार 

नायब सुभेदार : 35 हजार 400 ते 1,12,400 

सुभेदार : 44,900 – 1,42,400

सुभेदार मेजर: 47,600 – 1,51,100

लेफ्टनंट : 56,400 ते 1 लाख 77 हजार 500 

कॅप्टन: 61,300 – 1,93,900

मेजर: 69,400 – 2,07,200

लेफ्टनंट कर्नल: 1,21,200 – 2,12,400

कर्नल: 1,30,600 – ₹2,15,900

ब्रिगेडियर: एक लाख 39 हजार 600 ते 2,17,600

मेजर जनरल : एक लाख 44 हजार दोनशे ते दोन लाख 18 हजार दोनशे 

लेफ्टनंट जनरल: एक लाख 82 हजार दोनशे ते दोन लाख 14 हजार 100 

जनरल : अडीच लाख रुपये 

आठव्या वेतन आयोगात आर्मी जवानांचा पगार किती वाढणार? 

मीडिया रिपोर्ट नुसार, आगामी 8व्या वेतन आयोगात Fitment Factor 2.08 ते 2.57 दरम्यान राहणार असा अंदाज आहे. दरम्यान जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.08 ते 2.57 इतका निश्चित करण्यात आला तर सुभेदारचे मूळ वेतन 93,392 ते 1.15 लाखांदरम्यान असू शकते. सुभेदार मेजरचे मूळ वेतन 99 हजार ते 1.22 लाख दरम्यान असू शकते. कॅप्टनचे मूळ वेतन हे 1.27 लाख ते 1.57 लाख इतके असू शकते.

मेजरचे मूळ वेतन 1.44 लाख ते 1.78 लाख इतके राहू शकते. लेफ्टनंट कर्नलचे मूळ वेतन 2.52 लाख ते 3.11 लाख इतके राहू शकते. तर कर्नलचे वेतन 2.71 लाख ते 3.35 लाखांपर्यंत जाऊ शकते. मात्र हा एक फक्त अंदाज आहे प्रत्यक्षात आर्मी जवानांचा पगार आठवा वेतन आयोगात कितीने वाढणार हे जेव्हा आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पुढे येतील तेव्हाच कळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!