8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढवणार ? याबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका राहण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत आता आपण 1800, 1900, 2000, 2400, 2800 आणि 4200 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नव्या आठव्या वेतन आयोगात किती होणार? याबाबत माहिती पाहणार आहोत.

आठव्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
ग्रेड पे 1800 म्हणजे Level – 1 : सध्याच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत 1800 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18 हजार रुपये इतका आहे. मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मुळ वेतन 34 हजार 560 रुपये इतके होणार आहे.
मुळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA – 30%) म्हणजे 10,368 रुपये, वाहतूक भत्ता (TA – उच्च TPTA साठी) 1,350 मिळणार म्हणजे ग्रॉस सॅलरी 46 हजार 278 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS + CGHS साठी 3,706 रुपयांची वजावट होईल आणि 42,572 रुपये नेट सॅलरी मिळणार आहे.
ग्रेड पे 1900 म्हणजे Level 2 : सध्याच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत 1900 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 19 हजार 900 रुपये इतका आहे. मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मुळ वेतन 38 हजार 208 रुपये इतके होणार आहे.
मुळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA – 30%) म्हणजे 11,462 रुपये, वाहतूक भत्ता (TA – उच्च TPTA साठी) 1,350 मिळणार म्हणजे ग्रॉस सॅलरी 51 हजार 20 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS + CGHS साठी 4071 रुपयांची वजावट होईल आणि 46,949 रुपये नेट सॅलरी मिळणार आहे.
ग्रेड पे 2000 म्हणजे Level- 3 : सध्याच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत 2000 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 21 हजार 700 रुपये इतका आहे. मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मुळ वेतन 41 हजार 664 रुपये इतके होणार आहे.
मुळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA – 30%) म्हणजे 12,499 रुपये, वाहतूक भत्ता (TA – उच्च TPTA साठी) 3,600 मिळणार म्हणजे ग्रॉस सॅलरी 57 हजार 763 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS + CGHS साठी 4416 रुपयांची वजावट होईल आणि 53,347 रुपये नेट सॅलरी मिळणार आहे.
ग्रेड पे 2800 : सातवा वेतन आयोग अंतर्गत 2800 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 29 हजार 200 रुपये इतका आहे. मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मुळ वेतन 56 हजार 64 रुपये इतके होणार आहे.
मुळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA – 30%) म्हणजे 16,819 रुपये, वाहतूक भत्ता (TA – उच्च TPTA साठी) 3,600 मिळणार म्हणजे ग्रॉस सॅलरी 76 हजार 483 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS + CGHS साठी 5256 रुपयांची वजावट होईल आणि 70,627 रुपये नेट सॅलरी मिळणार आहे.
ग्रेड पे 4200 : सातवा वेतन आयोग अंतर्गत 4200 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 35 हजार 400 रुपये इतका आहे. मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मुळ वेतन 67 हजार 968 रुपये इतके होणार आहे.
मुळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA – 30%) म्हणजे 20,390 रुपये, वाहतूक भत्ता (TA – उच्च TPTA साठी) 3,600 मिळणार म्हणजे ग्रॉस सॅलरी 91 हजार 958 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS + CGHS साठी 7247 रुपयांची वजावट होईल आणि 84,711 रुपये नेट सॅलरी मिळणार आहे.
ग्रेड पे 4600 : सातवा वेतन आयोग अंतर्गत 4600 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 44 हजार 900 रुपये इतका आहे. मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मुळ वेतन 86 हजार 208 रुपये इतके होणार आहे.
मुळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA – 30%) म्हणजे 25,862 रुपये, वाहतूक भत्ता (TA – उच्च TPTA साठी) 3,600 मिळणार म्हणजे ग्रॉस सॅलरी 1 लाख 15 हजार 670 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS + CGHS+ इनकम टॅक्स म्हणून 15,931 रुपयांची वजावट होईल आणि 99,739 रुपये नेट सॅलरी मिळणार आहे.