IAS, IPS ते क्लर्क ; आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणाचा पगार किती वाढणार? वाचा डिटेल्स

Published on -

8th Pay Commission : आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. नव्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आता यश मिळाले आहे. सरकारने आज औपचारिक रित्या आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे.

खरे तर नव्या आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यात करण्यात आली होती पण याला दहा महिने उलटले तरी औपचारिक मंजुरी मिळत नव्हती आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळाली. अनेकांनी मोदी सरकार आठवावेतन आयोग ऐवजी इतर पर्याय पुढे आणेल असाही दावा केला.

मात्र आज सर्व प्रकारच्या चर्चांना आणि तर्कवितरकला पूर्णविराम लागला आहे. केंद्रातील मोदी सरकारने आज 28 ऑक्टोबर 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिक रित्या मान्यता दिली असून याच्या समितीची सुद्धा आज स्थापना करण्यात आली आहे.

आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची स्थापना झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई हे नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदावर विराजमान असतील. दरम्यान नव्या आयोगाच्या समितीची स्थापना झाली असल्याने येत्या सतरा अठरा महिन्यांमध्ये समितीकडून आपल्या शिफारशी सरकारकडे सादर केल्या जातील अशी शक्यता आहे.

अर्थात 2037 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होऊ शकतो. दरम्यान आज आपण नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आयएएस, आयपीएस पासून ते क्लर्क पर्यंतचा पगार कितीने वाढू शकतो या संदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या या लेखातून करणार आहोत.

किती वाढणार पगार? 

 सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगात 2.46 फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पगार वाढ मिळायला हवी अशी आग्रही मागणी उपस्थित करण्यात आली आहे. यामुळे आता सरकारकडून तसेच आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे राहणार आहे. 

पण जर समजा कर्मचारी संघटनांची ही मागणी मान्य झाली तर आठव्या वेतन आयोगात लिपिक, गट-ड आणि कनिष्ठ सहाय्यक (ज्युनियर असिस्टंट) पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार 44 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. आज या कर्मचाऱ्यांना 18 हजार रुपये इतका बेसिक पगार मिळतोय.

त्याचवेळी, नव्या वेतन आयोगात सेक्शन ऑफिसर आणि इन्स्पेक्टर दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा पगार एक 1.1 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज या कर्मचाऱ्यांना 44 हजार रुपये बेसिक पगार मिळतोय. 

उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना जसे की IAS, IPS आणि उच्च अधिकारी (लेव्हल 13 ते 18) यांचा किमान मूळ पगार हा 6 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आज रोजी या अधिकाऱ्यांचा किमान बेसिक पगार हा तीन लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News