8th Pay Commission : देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 1947 मध्ये पहिल्या वेतन आयोगाची भेट मिळाली. 1947 मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाल्यानंतर १९५७ मध्ये दुसरा वेतन आयोग लागू झाला आणि त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे.
सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला असून आता नवा आठवा वेतन आयोग पुढील वर्षी लागू होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब अशी की नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रातील मोदी सरकारकडून मान्यता सुद्धा मिळालेली आहे.

16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला हा निर्णय गेल्या एका दशकातील सर्वात मोठा निर्णय मानला जातोय.
दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर सबंध देशभरात या नव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणकोणते लाभ मिळणार, सरकारी कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा पगार किती वाढणार? नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असेल अशा अनेक गोष्टीबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
अशातच आता नवीन आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचे वेतन नेमके किती वाढणार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
कधी लागू होणार नवीन वेतन आयोग?
आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो आणि यानुसार पाहिलं तर 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होईल.
यानंतर मग एक जानेवारी 2026 पासून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. सध्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीच्या स्थापनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लवकरच यांची नावे सुद्धा जाहीर केली जाणार आहेत. दरम्यान नवीन वेतन आयोगाची समिती स्थापन झाली की मग प्रत्यक्षात समितीकडून कामकाज सुरू केले जाईल आणि त्यानंतर आपल्या शिफारशी सरकारला सुपूर्द केल्या जाणार आहेत.
फिटमेंट फॅक्टर किती असणार ?
नव्या आठव्या वेतन आयोगाचा केंद्रातील 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शन धारकांना फायदा होणार आहे. सध्याच्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा होता मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.86 एवढा राहण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये फिटमेंट फॅक्टर तीन टक्क्याहून अधिक राहील असाही अंदाज समोर येतोय. मात्र, या संदर्भात अजून कोणतीचं अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती राहणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
पगार किती वाढणार ?
मीडिया रिपोर्टनुसार, नव्या आठव्या वेतन आयोगात किमान मूळ पगार 19 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. हे किमान वेतन 51 हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते. तर, किमान पेन्शन देखील 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढू शकते असे बोलले जात आहे.