आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !

सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक नवीन अपडेट हाती आली आहे. हे अपडेट आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास आहे.

Published on -

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरे तर 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली.

सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला आणि दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असल्याने एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.

मात्र, अजून आठवा वेतन आयोग तयार झालेला नाही आणि TOR म्हणजेच संदर्भ अटी निश्चित केल्या गेलेल्या नाहीत. मात्र येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे.

अध्यक्षांची आणि सदस्यांची नावे जवळपास अंतिम झाली आहेत मात्र अजून अध्यक्ष आणि सदस्यांची नावे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण लवकरच हे सुद्धा काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर नव्या आठव्या वेतन आयोगाचा कामकाजाला सुरुवात होईल.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पण आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारे बातमी समोर होता.

आठव्या वेतन आयोगाला होणार उशीर 

आतापर्यंत केंद्र सरकारने 8 वा वेतन आयोग तयार केलेला नाही. सहसा दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. सध्याचा 7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. सध्याचा वेतन आयोग हा 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे आणि अशा परिस्थितीत असे मानले जात आहे की पुढील आयोग 2026 पासून प्रभावी ठरू शकेल,

परंतु अद्याप आठवा वेतन आयोग स्थापित झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे TOR. वास्तविक, TOR अंतिम होईपर्यंत, कमिशन तयार होऊ शकत नाही

किंवा तो आपला अहवाल तयार करण्याचे काम सुरू करू शकत नाही. असे सांगितले जात आहे की या वेळी ToR तयार करण्यास अधिक वेळ लागत आहे. यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुद्धा उशीर होण्याची शक्यता आहे.

आठवा वेतन आयोग कधी स्थापित होणार?

आठव्या वेतन आयोगाच्या समितीच्या स्थापनेला उशीर होत आहे. यामुळे साहजिकच आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास सुद्धा वेळ लागणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर समजा 2025 च्या शेवटी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाली

तर या समितीला शिफारशी तयार करण्यासाठी, रिपोर्ट तयार करण्यासाठी किमान 15 महिने लागू शकतात आणि जास्तीत जास्त 18 महिने लागू शकतात. यानुसार आठव्या वेतन आयोगाचा रिपोर्ट हा सरकारकडे 2027 मध्येच येईल असे बोलले जात आहे. म्हणजेच आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी 2027 मध्येच होणार आहे पण हा आयोग एक जानेवारी 2026 पासूनच लागू राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe