8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. खरे तर, जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिल्यानंतर आता आयोगाच्या स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेचे पालन सुद्धा सुरू झाले आहे.
यामुळे येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होण्याची शक्यता आहे. तथापि अजून आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. मात्र लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल अन मग त्यानंतर आठवा वेतन आयोगाच्या समितीकडून आपले काम सुरू होणार आहे.

सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून प्रभावी आहे. याच्या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि हा आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो.
यानुसार सध्याच्या वेतन आयोगाचे आयुष्य हे फक्त डिसेंबर 2025 अखेरचे आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होईल अशी शक्यता असून एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होईल अशी माहिती जाणकार लोकांकडून समोर येत आहे.
पण आठवा वेतन आयोग सुरुवातीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि त्यानंतर मग विविध राज्य शासनाच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारला जातील आणि त्या त्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.
अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी कोणत्या राज्यांमध्ये सुरू होणार आणि आठवा वेतन आयोगामुळे कोणत्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा पगार सर्वाधिक वाढणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात आधी आठवा वेतन आयोग लागू होणार
नवीन वेतन आयोग आधी केंद्रातील कर्मचाऱ्यांना लागू होतो आणि त्यानंतर मग केंद्राच्या माध्यमातून राज्यांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली जातात. पण केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लगेचच राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू होत नाही.
राज्य सरकार आपल्या तिजोरीचे भान ठेवून नवीन वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेत असते. मात्र मागील वेतन आयोगाचा अनुभव पाहिला असता सुरुवातीला आठवा वेतन आयोग महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये लागू झाला होता आणि
या राज्यांनी नवा वेतन आयोग लागू केल्यानंतर मग मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये नवा वेतन आयोग लागू झाला होता. यामुळे आठवा वेतन आयोग सुद्धा सुरुवातीला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये लागू होऊ शकतो
तसेच बिहार आणि मध्य प्रदेश सुद्धा लवकरात लवकर नवा आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. तथापि या संदर्भातील निर्णय राज्य शासन आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊनच घेणार आहे.
कोणत्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सर्वाधिक वाढणार ?
नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्ता यावर अवलंबून राहील. सध्या आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढवला जाईल अशा चर्चा आहेत. असे झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार सुमारे 186 टक्क्यांनी वाढू शकतो.