Good News : सरकारी विभागात क्लर्क, शिपाईसह ‘या’ पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 15000 रुपयांनी वाढणार !

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी मिळाली असून आता लवकरच या नव्या आयोगाच्या समितीकडून आपले कामकाज सुरू केले जाणार आहे.

Published on -

8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. जानेवारी महिन्यात आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर या आगामी वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत.

खरंतर वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता.

तसेच त्या आधीचा सहावा वेतन आयोग हा 2006 मध्ये लागू झाला होता. यानुसार आता नवा आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या क्लर्क, शिपाई आणि MTS म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबतची संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार ?

आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. दरम्यान आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 18 हजार रुपयांवरून 34560 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. कारण की नव्या आठव्या वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

सध्याच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर सातवा वेतन आयोगामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 7,000 रुपयांवरून 18 हजार रुपये इतका करण्यात आला होता. तसेच सहाव्या वेतन आयोगात किमान मूळ पगार हा 2,750 रुपयांनी वाढून सात हजार रुपये इतका करण्यात आला आहे.

क्लर्क, शिपाईचा पगार किती वाढणार ?

नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय शासकीय सेवेतील शिपाई, लिपिक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) इत्यादींसारखे सर्वात खालच्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

या कर्मचाऱ्यांच्या पगारात कमाल 15000 रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते असा दावा केला जातोय. नक्कीच यामुळे या संबंधित पदावर कार्यरत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

तथापि या संदर्भातील योग्य ती माहिती नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी समोर आल्यानंतरच मिळू शकणार आहे. परंतु नव्या आठव्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास यावेळी व्यक्त होतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News