आठवा वेतन आयोगाबाबत लोकसभेतून समोर आली मोठी अपडेट ! केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी दिली नवीन वेतन आयोगाची माहिती

आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. लोकसभेत आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून मोठी माहिती देण्यात आली आहे. 

Published on -

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी लोकसभेतून मोठी माहिती समोर येत आहे. कालपासून अर्थातच 21 जुलै 2025 पासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. खरंतर काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत म्हणजेच आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा झाली.

लोकसभेचे खासदार आनंद भदोरिया व टी आर बाळू यांनी आठवा वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. खरे तर केंद्रातील मोदी सरकारकडून जानेवारीमध्ये नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली.

16 जानेवारी 2025 रोजी मोदी सरकारने नवीन आठवा वेतन आयोग स्थापित करण्यास मान्यता दिली. मात्र अजूनही नव्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही. नव्या आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती अजूनही बाकीच आहे.

यामुळे नवीन वेतन आयोगाची समिती कधी स्थापित होणार आणि आयोगाकडून कधीपर्यंत नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारकडे सादर केल्या जाणार हा मोठा प्रश्न आहे.

हेच कारण आहे की लोकसभा खासदार आनंद भदोरिया व टी आर बाळू यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली, पण आठवा वेतन आयोगाच्या समितीसाठी अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती का करण्यात आलेली नाही? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. दरम्यान यावर सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. 

सरकारने काय म्हटले ? 

खासदार आनंद भदोरिया व टी आर बाळू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला केंद्रातील सरकारमधील वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी असे सांगितले आहे की, आठवा वेतन आयोग हा तेव्हांच लागु केला जाईल ज्यावेळी वेतन आयोग मार्फत शिफारसी देण्यात येतील.

मात्र वित्त राज्यमंत्री महोदयांनी आठव्या वेतन आयोगाच्या समिती बाबत कोणतीच माहिती दिली नाही. परंतु वित्त राज्यमंत्री यांच्या विधानावरून आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीस उशीर होण्याची शक्यता आहे.

आठवा वेतन आयोगाचा मुद्दा आता लांबणीवर पडणार आहे. खरे तर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन आता जवळपास सहा महिन्यांचा काळ उलटला आहे. पण अजूनही समितीची स्थापना झालेली नाही.

दरम्यान खासदारांकडून आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य निवडीबाबत तसेच टर्म्स ऑफ रेफरन्स विषयक माहिती मागविण्यात आलेली आहे. यामुळे आता या माहितीमधून काय समोर येते हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!