8th Pay Commission : तज्ञांचे आठवा वेतन आयोगाबाबत मोठे भाकीत ! ‘या’ तारखेपासून लागू होणार

सरकारने जानेवारी महिन्यात आठवा वेतन आयोग स्थापित करण्याची मोठी घोषणा केली आहे, पण अजून सरकारने आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही. किंबहुना कोणतेच संकेत सुद्धा दिलेले नाहीत. मात्र, तज्ञांकडून आता आठवा वेतन आयोगाबाबत मोठे भाकीत वर्तवले जात आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्याची अंदाजित तारीख समोर आली आहे.

Updated on -

8th Pay Commission News : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू झाला होता, पण वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होणे आवश्यक असते. यानुसार 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित होते आणि अपेक्षेप्रमाणे केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आठवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे.

खरंतर, आठवा वेतन आयोगाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. मात्र आठवा वेतन आयोगाबाबत नेहमीच केंद्रातील मोदी सरकारकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. सरकार दरबारी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही असे उत्तर सरकारने कित्येकदा संसदेत दिले.

आठवा वेतन आयोग लागू कधी होणार ?

मात्र प्रत्यक्षात सरकारच्या मनात काही वेगळं सुरू होतं, म्हणूनचं अचानकपणे, अगदीच कुणाला कल्पनाही नसेल आणि सरकारकडून जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली. पण आता प्रश्न असा घोषणा झाली पण प्रत्यक्षात आठवा वेतन आयोग लागू कधी होणार ? दरम्यान आता याचबाबत एक नवी अपडेट समोर येत आहे ज्याचा आज आपण उहापोह करणार आहोत.

दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग

देशात पहिला वेतन आयोग 1946 मध्ये स्थापन झाला. यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग 2014 मध्ये स्थापित झाला आणि प्रत्यक्षात सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी 2016 पासून सुरू झाली.

आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित

आता सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे आणि यामुळे नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित होते. दरम्यान 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे.

शिफारशी कधीपासून लागू होणार ?

सरकारने नवीन वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतलाय, आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी कधीपासून लागू होणार ? हा मोठा प्रश्न आहे आणि याचेचं उत्तर आता समोर आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

खरंतर सरकारने नवीन आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याची कोणतीच घोषणा केलेली नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. पण, तज्ञांकडून नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होऊ शकतो याची एक अंदाजित तारीख सांगितली जात आहे.

1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू

तज्ञांनी एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. डिसेंबर 2025 मध्ये सातवा वेतन आयोगाची समाप्ती होईल आणि त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होईल असे म्हटले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe