8th Pay Commission News : 17 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची आठव्या वेतन आयोगाची मागणी मान्य केली. या दिवशी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रातील सरकारकडून मान्यता मिळाली.
आता, लवकरच आठवा वेतन आयोगाच्या समितीच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यानंतर या समितीच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारकडे पाठवल्या जाणार आहेत.

मात्र, जेव्हापासून आठवा वेतन आयोग स्थापनेला मान्यता मिळाली आहे, तेव्हापासून यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि आता याच चर्चेला एक नवीन वळण मिळाले आहे. मीडियारिपोर्ट्समध्ये आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त पद किंवा वरिष्ठतेच्या आधारावर वेतनवाढ लागू होणार नसल्याचे म्हटले जात आहे.
नव्या वेतन आयोगात पद किंवा वरिष्ठतेच्या आधारावर वेतन वाढ लागू होणार नसून कामाच्या आधारावर म्हणजेच परफॉर्मन्स बेस्ड पगारवाढ लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण कामाच्या आधारावर लागू होणारी वेतन वाढ नेमकी कशी असेल, ही संकल्पना नेमकी काय आहे, मागील वेतन आयोगात देखील अशी संकल्पना समोर आली होती का ? याबाबत जाणून घेणार आहोत.
काय आहेत डिटेल्स ?
खरेतर, परफॉर्मन्स बेस्ड पे स्केलची चर्चा आताच सुरु झालेली नाही. ही चर्चा चौथ्या वेतन आयोगात देखील झाली होती. पण त्यावेळी ही संकल्पना अंमलात आली नाही. परफॉर्मन्स रिलेटेड पेमेंट म्हणजे PRP ची संकल्पना नवीन नाही.
चौथ्या वेतन आयोगाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्हेरीएबल इन्क्रीमेंट देण्याची शिफारस केली होती. पुढे, पाचव्या वेतन आयोगात हे तत्त्व अधिक स्पष्टपणे मांडले गेले.
तसेच यापुढे 6 व्या वेतन आयोगात परफॉर्मन्स रेलिटेड इंसेण्टिव्ह स्कीम म्हणजे PRIS चा प्रस्ताव समोर आला होता. त्यानुसार, कर्मचार्याच्या वैयक्तिक किंवा टीमच्या परफॉर्मन्सच्या आधारे वार्षिक बोनस दिला जाईल, असे नमूद करण्यात आले होते.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने असा एक मॉडेल सुचवला होता, ज्यामध्ये व्हेरीएबल पे हा वैयक्तिक व टीम परफॉर्मन्सवर आधारित असेल. दरम्यान, सध्याच्या 7व्या आयोगाने देखील परफॉर्मन्स बेस्ड वेतनवाढीच्या संकल्पनेला दुजोरा दिला आहे.
कर्मचाऱ्याच्या वार्षिक अॅप्रेझल रिपोर्ट, कामाची गुणवत्ता, आणि कामातून मिळणारे परिणाम यांचा अभ्यास करून वेतनवाढीचा निर्णय घेण्याची शिफारस त्यांनी केली होती.
पण त्यांनी हेही सुचवलं की, वेगळं नवं यंत्रणा उभारण्याऐवजी सध्याच्या पद्धतीतच थोडेसे बदल करून घ्यावेत अन ते लागू करणं अधिक व्यवहार्य ठरणार आहे. आता, 8 व्या वेतन आयोगात पुन्हा अशाच संकल्पनेची अशीच अपेक्षा आहे की, कामाच्या गुणवत्तेनुसार वेतनवाढीचा फॉर्म्युला अधिक स्पष्ट होईल.
यामुळे, केवळ वरिष्ठतेवर आधारित वेतनवाढ थांबेल आणि गुणवत्ता, कामगिरी आणि परिणामकारकतेला अधिक महत्त्व दिलं जाईल. म्हणून, आता 8व्या वेतन आयोगात नेमकं काय होत ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.