8th Pay Commission : तीन साडेतीन महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सातव्या वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली. सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग हा 31 डिसेंबर 2025 रोजी दहा वर्षांचा होणार आहे.
आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता दर दहा वर्षांनी नवावेतन आयोग लागू होत असतो यामुळे 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याच्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपणार आहे आणि एक जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.

याच अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार याबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
आठवा वेतन आयोगाचा लाभ किती कर्मचाऱ्यांना मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार नव्या आठव्या वेतन आयोगाचा लाभ देशभरातील 50 लाख कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शन धारकांना होणार आहे. या संबंधित कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाअंतर्गत थेट लाभ मिळणार आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे यामुळे नवीन आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे तसेच याच्या समितीच्या स्थापनेसाठी देखील युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आता आपण आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल याबाबत माहिती पाहुयात.
किती वाढणार पगार ?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर जवळपास 19 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. तज्ञ लोक सांगतात की, बजेटमधील पैशांच्या वाटपानुसार नव्या वेतन आयोगात पगार निश्चित केला जातो.
जर समजा बजेटमध्ये 1.75 लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली तर पगार दरमहा एक लाख 14 हजार 600 रुपये इतका होणार आहे. जर दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर पगार एक लाख 16 हजार 700 रुपयांवर पोहोचेल आणि जर समजा 2.25 लाख कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली तर पगार एक लाख 18 हजार 800 रुपये इतका होणार आहे.
म्हणजेच सध्याच्या सातव्या वेतन आयोगातून ज्या कर्मचाऱ्यांना एक लाख रुपये महिना एवढा पगार मिळतोय त्यांना आठव्या वेतन आयोगात एक लाख अठरा हजार आठशे रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे म्हणजेच 18,800 रुपये अतिरिक्त वेतन मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा पगार हा जवळपास 19 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
फिटमेंट फॅक्टर पण महत्वाचा असतो
नव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे आणि पगार वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर सुद्धा खूपच महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. जेव्हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता म्हणजेच त्यावेळी सरकारने 1.02 लाख कोटी रुपये खर्च केले होते आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका ठेवण्यात आला होता.
दरम्यान सातवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार हा 7000 रुपयांवरून 18000 रुपये एवढा झाला होता. आता नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 एवढा करण्याची मागणी जोर धरत आहे. असे झाल्यास किमान बेसिक पगार 18000 रुपयांवरून थेट 51 हजार रुपयांपर्यंत वाढेल असे म्हटले जात आहे.