आठवा वेतन आयोग सरकारी नोकरीचे स्वरूप बदलणार ! पगार ठरवण्याची पद्धत बदलणार, खाजगी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार वेतन, सरकारचा प्लॅन पहा…

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी मिळाल्यानंतर या आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नवीन वेतन आयोगात कोणकोणते बदल होणार, कोणकोणते भत्ते वाढणार, कोणते नवीन भत्ते ऍड होणार, कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार, पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढू शकते असे असंख्य प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहेत.

अशातच आता नव्या आयोगाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवीन आयोग देशातील सरकारी नोकरीचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

नवीन आयोगात सरकारकडून असे धोरण स्वीकारले जाणार आहे जे की अगदीच खाजगी क्षेत्रासारखे राहणार आहे. सरकारी नोकरदार मंडळीला नव्या आयोगात खाजगी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जाईल असाही दावा केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार नव्या वेतन आयोगात अनेक धोरणात्मक बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात. या नव्या बदलांमुळे सरकारी नोकरी आता स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी नाही तर एक ग्रोथ-ड्रिव्हन करिअर म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

सरकारी नोकरीत आता कार्यक्षमता, जबाबदारी आणि परिणामकारकता अशा घटकांना प्राधान्य मिळणार आहे. सरकारने नव्या आयोगाला सरकारी नोकरी प्रायव्हेट नोकरी प्रमाणे आकर्षक बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

नव्या आयोगात उच्च तांत्रिक कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धात्मक वेतनमान तयार केले जाणार आहे. नव्या वेतन आयोगात पगार ठरवण्याची पद्धत सुद्धा चेंज होणार आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवाच्या जोरावर तसेच पदावर आधारित पगार वाढ दिली जात होती.

मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाच्या आधारावर बोनस आणि पगार वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सरकार परफॉर्मन्स बेस्ड सिस्टम अमलात आणू शकते असा मोठा दावा करण्यात आला आहे.

म्हणजेच नव्या आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ आणि प्रमोशन या गोष्टी त्यांच्या कामगिरीवर आधारित राहणार आहे. अर्थात खाजगी क्षेत्रात ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित लाभ मिळतात तसाच लाभ आता सरकारी सेवेतही देण्याची योजना सरकारने आखली आहे.

यामुळे तांत्रिक आणि व्यावसायिक पदांवर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना खाजगी क्षेत्रासारखे आकर्षक वेतन मिळू शकते. यामुळे आता नव्या आयोगात नेमक्या कोणत्या गोष्टी ऍड होतात, नव्या आयोगाचे स्वरूप काय राहणार, याचा कर्मचाऱ्यांना कसा लाभ होणार? या सगळ्या गोष्टी भविष्यात पाहण्यासारख्या ठरणार आहेत.