8th Pay Commission : केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला. सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे याचा लाभ जुलै 2025 पासून दिला जातोय.
दरम्यान सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनंतर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील अनुक्रमे 8 आणि 5 टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला. अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.

खरे तर आठव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यात झाली आहे पण अजूनही आयोगाच्या समितीची स्थापना काही होऊ शकलेली नाही. त्यामुळे आयोगाचे कामकाज लांबणीवर पडत आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती तयार झालीये.
सातव्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर त्याची फेब्रुवारी 2014 मध्ये झाली होती आणि त्याचा अहवाल सरकारकडे 2015 मध्ये जमा होता. यानुसार जर या महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करण्यात आली तर साधारणता जुलै 2027 मध्ये याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांत मोठी उत्सुकता आहे. सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शन धारकांना याचा लाभ देण्यात येणार आहे. संरक्षण विभागातील कार्यरत जवान तसेच निवृत्त सैनिकांनाही आठवा वेतन आयोग अंतर्गत पगार वाढ आणि इतर भत्ते वाढीचा लाभ मिळेल.
वेतनवाढ कशी होणार?
8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा मुख्य आधार मानला जाईल. माजी वित्तीय सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या मते, केंद्र सरकार 1.92 ते 2.08 या दरम्यान फिटमेंट फॅक्टर निश्चित करू शकते. तर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पगारवाढ अधिक प्रभावी व्हावी यासाठी 2.86 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे.
जर ही मागणी मान्य झाली, तर वेतनात मोठी वाढ दिसू शकते. 7 व्या वेतन आयोगाची मुदत डिसेंबर 2025 मध्ये संपत आहे. त्यानंतरचा कालावधी म्हणजे जानेवारी 2026 ते जून 2027 या 18 महिन्यांतील थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाऊ शकते.
जर 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर शिपाईच्या पगारातच सुमारे 33,480 रुपयांची वाढ होईल. आता जर 18 महिन्यांची सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी पण मिळाली तर शिपाई पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सहा लाख 2 हजार 640 रुपयांची थकबाकी सुद्धा मिळणार आहे.
हे थकबाकी एक रकमी मिळेल किंवा मग समान हफ्त्यांमध्ये याचे वाटप होईल. सातव्या वेतन आयोगात सुद्धा असेच झाले होते आणि नव्या वेतन आयोगात देखील असेच होऊ शकते.