8th Pay Commission : केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठी भेट दिली आहे. केंद्रातील सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना (Terms of Reference – TOR) नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
खरे तर या निर्णयाची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती आणि अखेर कार सरकारने हा निर्णय घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सरकारने जानेवारी महिन्यातच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती मात्र आयोगासाठीच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला मान्यता मिळत नव्हती.

याच्या समितीची स्थापना होत नव्हती आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठे अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळाले. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि कर्मचारी संघटनांमध्ये शासनाविरोधात नाराजी सुद्धा दिवसेंदिवस वाढत होती.
प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे यानुसार पुढील वर्षापासून नवीन आठवावेतन आयोग बहाल झाला पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती आणि यामुळे नव्या आयोगाच्या कामकाजाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती.
दरम्यान आठव्या वेतन आयोगासाठी सातत्याने कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा केला जात होता आणि याच पाठपुराव्याच्या अनुषंगाने आता सरकारने याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला मान्यता दिली असून आता प्रत्यक्षात आयोगाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.
आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगार आणि निवृत्तीवेतनात मोठ्या वाढीची औपचारिक प्रक्रिया सुरू झालीये असं आपण म्हणू शकतो. या नव्या आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या आठव्या वेतन आयोगात सर्वात महत्त्वाचा घटक राहणार तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर हा असा गुणांक असतो, ज्याने विद्यमान Basic Pay ला म्हणजे मूळ वेतनाला गुणून नवीन वेतन निश्चित केलं जातं.
कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीज आणि एम्बिट कॅपिटल यांच्या अहवालांनुसार हा फिटमेंट फॅक्टर यावेळी 1.8 ते 2.46 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोटकच्या अंदाजानुसार जर 1.8 चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचे म्हणजेच शिपाई व इतर तत्सम पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून थेट 32,400 रुपयांपर्यंत जाईल.
या अहवालानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सुमारे 80 टक्के वाढेल असे भासते. मात्र प्रत्यक्षात वाढ यापेक्षा कमी असेल, कारण नवीन वेतन लागू होताच महागाई भत्ता (DA) शून्य केला जाईल. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 58 टक्के डीए मिळतोय.
दुसरीकडे एम्बिट कॅपिटलच्या मते, नव्याने लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगात यावेळी फिटमेंट फॅक्टर 1.82 इतका फायनल केला जाईल. या फिटमेंट फॅक्टरनुसार प्रत्यक्ष वेतनवाढ 14 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील, तर 2.15 फॅक्टर असल्यास ती 34 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
पण फॅक्टर 2.46 फॅक्टर लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात 54 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक भत्ता (TA) यांचा समावेश केल्यानंतर एकूण वेतनवाढ थोडी कमी असली तरी, 8वा वेतन आयोग केंद्र कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा राहणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.