आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ! काही सरकारी कर्मचाऱ्यांना……

सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. अर्थातच 1 जानेवारी 2026 पासून नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. खरंतर आठव्या वेतन आयोगाचा 50 लाख कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शन धारकांना मिळणार असा दावा केला जात आहे.

Published on -

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर सध्या सर्वत्र नव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरु आहेत. नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला 16 जानेवारी 2025 रोजी मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून या नव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. खरंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो.

सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. म्हणजेच 31 डिसेंबर 2025 मध्ये सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. अर्थातच 1 जानेवारी 2026 पासून नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.

खरंतर आठव्या वेतन आयोगाचा 50 लाख कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शन धारकांना मिळणार असा दावा केला जात आहे. अशातच, आता आठवा वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

खरं तर मीडिया रिपोर्ट मध्ये 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचा दावा केला जात होता. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना खरंच आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही का ? याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आता आपण निर्मला सीतारामन यांनी नेमक काय म्हटलं आहे याबाबत जाणून घेणार आहोत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी माहिती दिली. सीतारामन यांनी पेन्शनधारकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही असे म्हटले आहे.

त्यांनी यावेळी असे स्पष्ट केले आहे की, वित्त विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी आहेत. यामुळे पेन्शन लाभांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. सातवा वेतन आयोग अंतर्गत सर्व पेन्शनधारकांना समान लाभ मिळाले आहेत, मग ते निवृत्त झाल्याची तारीख काहीही असो.

दरम्यान सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच आठव्या वेतन आयोगात देखील हाच नियम लागू होणार आहे. सातव्या वेतन आयोग प्रमाणेच आठव्या वेतन आयोगात देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकार हेच धोरण स्वीकारणार आहे.

यामुळे एक जानेवारी 2026 च्या आधी जरी सरकारी कर्मचारी निवृत्त झालेत तरीसुद्धा त्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत राहणार आहे. पुढे बोलतांना त्या म्हणाल्यात की, सहाव्या वेतन आयोगात निश्चितच फरक होता, परंतु सातव्या वेतन आयोगात सर्व पेन्शनधारकांना समान पेन्शन देण्यात आली.

दरम्यान कोणताही कर्मचारी किंवा पेन्शनधारक मागे राहू नये म्हणून आठव्या वेतन आयोगातही हेच धोरण स्वीकारले जाईल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशियल मीडियामध्ये 1 जानेवारी 2026 च्या आधी जे कर्मचारी निवृत्त होतील त्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही अशा ज्या चर्चा सुरू आहेत त्या निरर्थक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News