8th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी 2025 मध्ये मोठा निर्णय घेतला, खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होत्या त्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. 16 जानेवारी 2025 हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला.
दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. खरंतर सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी पूर्णतः दहा वर्षांचा होणार आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे.

यानुसार नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून बहाल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच नव्या वेतन आयोग लागू होण्याचा काळ जवळ येतोय. यामुळे सध्या सर्वत्र आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू असून नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. अशातच आता आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरवताना महत्त्वाच्या अशा फिटमेंट फॅक्टर बाबत आणि महागाई भत्ता तसेच घर भाडे भत्ता संदर्भात नवीन अपडेट हाती आली आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या 3 गोष्टींमध्ये नेमका कोणता बदल होणार आणि याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार याच संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.
फिटमेंट फॅक्टर किती वाढणार?
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 2.86 वर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पगारात मोठी वाढ होणार आहे. तथापि सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून फिटमेंट फॅक्टर 3.86 पट पर्यंत वाढवला गेला पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे.
यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर काय निर्णय होणार आणि हा फॅक्टर नेमका किती वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण जर समजा फिटमेंट फॅक्टर 2.86 झाला तर 20,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याचा एकूण पगार 51 हजार 400 रुपये इतका होणार आहे.
महागाई भत्त्यात पण बदल होणार
नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका केला आहे. ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली असून आता जुलै 2025 पासून पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बदलणार आहे.
यावेळी सुद्धा महागाई भत्ता दोन ते तीन टक्क्यांनी वाढू शकतो म्हणजेच महागाई भत्ता 57 ते 58% वर जाऊ शकतो. दुसरीकडे, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर हाच महागाई भत्ता बेसिक पगारात ऍड केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
HRA सुद्धा बदलणार बर
घर भाडे भत्ता म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स सुद्धा आठव्या वेतन आयोगात मोठ्या प्रमाणात बदलू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तर सहाव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता 10 टक्के ते 30 टक्के इतका मंजूर करण्यात आला होता. शहरानुसार हे दर बदलतात. पुढे सातव्या वेतन आयोगात घरभाडे भत्ता बदलला गेला. सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना 9, 18 आणि 27 % दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात आला होता.
तसेच यामध्ये जेव्हा महागाई भत्ता 50% होईल तेव्हा ऑटोमॅटिक वाढ होईल असे सुद्धा प्रावधान ॲड करण्यात आले होते. यानुसार सध्या घर भाडे भत्ता दहा टक्के, वीस टक्के आणि 30 टक्के असा झाला आहे. हे दर शहरानुसार लागू होतात. दरम्यान आता आठवा वेतन आयोगात पुन्हा एकदा घर भाडे भत्ता रिवाईज होऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत, त्यामुळे नव्या वेतन आयोगात हा भक्ता नेमका कसा असेल हे पाहणे खरंच उत्सुकतेचे ठरणार आहे.