8वा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! नवीन वेतन आयोगाच्या समितीची स्थापना कधी होणार ? समोर आली मोठी अपडेट

तारीख 17 जानेवारी 2025, हाच तो दिवस ज्या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाची घोषणा केली. म्हणजेच आठवा वेतन आयोगाच्या घोषणेला आता एका महिन्याहून अधिकचा काळ उलटला आहे. पण अजूनही आठवा वेतन आयोगाची समिती स्थापित झालेली नाही.

Updated on -

8th Pay Commission : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरू होती, त्या आठवा वेतन आयोगाची जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने घोषणा केली. 17 जानेवारी 2025 रोजी मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाची घोषणा केली. पण आता आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना कधी होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय.

खरे तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो. सध्याचा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे. म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये सातवा वेतन आयोगाला तब्बल दहा वर्षे पूर्ण होणार आहेत. यामुळे जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.

मात्र सध्याचा सातवा वेतन आयोग लागू होण्याआधी त्याच्या समितीची स्थापना करण्यात आली होती. 2014 मध्ये सातवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाली. पुढे या समितीने आपल्या शिफारशी सरकारकडे सुपूर्द केल्यात आणि केंद्रातील सरकारने समितीच्या या शिफारशी स्वीकृत करत एक जानेवारी 2016 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला.

यावेळी आठवा वेतन आयोगाची घोषणा उशिरा झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनच समितीबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. म्हणून आज आपण या संदर्भात समोर आलेली एक नवीन अपडेट थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना कधी?

गेल्या काही वेतन आयोगाचा आढावा घेतला असता वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर दोन ते पाच महिन्यांच्या काळात समिती गठित केली जात असते. खरे तर पाचवा वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर वेतन आयोगाची समिती फक्त दोन महिन्यात स्थापित झाली होती.

सहावा वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर वेतन आयोगाची समिती तीन महिन्यात स्थापित झाली होती. सातवा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर पाच महिन्यात समितीची स्थापना करण्यात आली होती.

म्हणून आता आठवा वेतन आयोगाची समिती देखील लवकर स्थापित होण्याची आशा व्यक्त होऊ लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार जून 2025 पर्यंत आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली जाणार आहे.

समितीची स्थापना झाल्यानंतर या समितीच्या माध्यमातून सरकारला शिफारशी सुचवल्या जाणार आहेत अर्थात याचा एक रिपोर्ट दिला जाणार आहे. त्यानंतर मग समीक्षा समितीची स्थापना केली जाईल. वेतन आयोगाच्या समितीकडून ज्या शिफारशी सरकारला दिल्या जातात त्या शिफारशी समीक्षा समितीकडून चेक केल्या जातात.

शिफारशींची पडताळणी झाल्यानंतर मग अंतिम निर्णयासाठी याचा प्रस्ताव हा कॅबिनेट कडे पाठवला जाईल. एकदा की कॅबिनेटने या शिफारशी स्वीकारल्यात की मग नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

त्याची अंमलबजावणी ही कधीपासून सुरू होणार हे अजून समोर येऊ शकलेले नाही पण सध्याच्या सातवा वेतन आयोगाला डिसेंबर 2025 मध्ये दहा वर्षे पूर्ण होणार असल्याने एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe