आठव्या वेतन आयोगात कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?

Published on -

8th Pay Commission : तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत आहात का किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरदार आहे का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर सध्या सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत.

नोव्हेंबर २०२५ मध्ये सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली असून आयोगासाठीच्या समितीला दीड वर्षांच्या काळात अहवाल सरकार दरबारी सादर करण्याचे निर्देश मिळाले आहेत.

यानुसार तीन सदस्य समितीच्या माध्यमातून युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले असून दिलेल्या वेळेत समतीकडून आपला अहवाल सरकार दरबारी जमा होईल अशी शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी साधारणता २०२७ च्या मध्यात येतील.

पण प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग हा १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. म्हणजेच नवा वेतन आयोग लागू होतानाच सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकीचा पण लाभ मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आठव्या वेतन आयोगात सुद्धा थकबाकीचा लाभ समान हप्त्यांमध्ये वितरित होईल. दरम्यान आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच एक महत्त्वाचे अपडेट आहे. नव्या आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलीये.

कोणाचा पगार किती वाढणार ?

नव्या आयोगात मुळ पगार फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर ठरवला जाणार आहे. ७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. ज्यामुळे मुळ वेतन ७,४४० रुपयांवरून थेट १८,००० रुपये झाले.

पेरोल सर्व्हिसेस कंपनी नेक्सडिग्मचे संचालक रामचंद्रन कृष्णमूर्ती यांनी आठव्या वेतन आयोगात पगार वाढ पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल असं स्पष्ट केलं आहे. कृष्णमूर्तींचा अंदाज आहे की फिटमेंट फॅक्टर १.९ ते २.५ पर्यंत असू शकतो आणि तो सर्व कर्मचाऱ्यांना समान प्रमाणात लागू केला पाहिजे.

कर्मा मॅनेजमेंट ग्लोबल कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​एमडी प्रतीक वैद्य यांचाही असाच अंदाज आहे. वैद्य यांच्या मते, फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.४६ दरम्यान असू शकतो.

तथापि, २.५७ चा फॅक्टर नाकारता येत नाही, असाही अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे. यामुळे आता फिटमेंट फॅक्टर नेमका किती वाढणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

पण जर समजा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नव्या वेतन आयोगात पण फिटमेंट फॅक्टर २.५७ राहिला तर अशावेळी ड संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८ हजार रुपयांवरून थेट ४६,२६० रुपये होणार आहे. ग्रुप Aच्या कर्मचाऱ्यांचा पगार ५६ हजार १०० रुपयांवरून एक लाख वीस हजार ६१५ रुपये होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe