8th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. तेव्हापासून नव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. आठव्या वेतन आयोगात काय काय बदल होणार कोणाला कसा लाभ मिळणार किती लांब मिळणार अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.
मात्र आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर तब्बल 10 महिना वेतन आयोगाबाबत कोणते हालचाल झाली नाही आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन धारक चिंतेत आले होते. पण अखेरकार ऑक्टोबर महिना पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचे आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन आला.

कारण की केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी दिली. आठव्या वेतन आयोगासाठीचे टर्म्स ऑफ रेफरन्स ला सरकारकडून मंजुरी मिळाली. आयोगासाठीच्या समितीची स्थापना झाली. अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. नव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शन धारकांचा पगार अधिक वाढणार असल्याचा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जातोय. आता आपण नव्या आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना कोणकोणते लाभ मिळू शकतात याबाबतचा आढावा येथे घेणार आहोत.
पेन्शन धारकांना कोणकोणते लाभ मिळणार
पेन्शन वाढवण्यात फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्वाची भूमिका बजावतो. हा एक गुणक आहे जो जुना बेसिक पगार किंवा बेसिक पेन्शन नवीन पगारात रूपांतरित करण्यासाठी वापरला जातो. 7 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 राहिला आहे.
याचा अर्थ असा की जर एखाद्याचा सहाव्या वेतन आयोगातील बेसिक पगार 10 हजार रुपये असेल तर नवीन सातव्या वेतन आयोगात पगार 10 हजार × 2.57 = 25 हजार 700 रुपये झाला. आता आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ठरवला जाईल.
दरम्यान मीडिया रिपोर्ट्स मध्ये यावेळी फिटमेंट फॅक्टर 2.0 राहू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. जर मीडिया रिपोर्टचा हा अंदाज खरा ठरला तर 20,000 रुपये पेन्शन असणाऱ्या पेन्शन धारकाची पेन्शन नव्या वेतन आयोगात 40 हजार रुपये होणार आहे.
पेन्शनधारकांची फक्त मूळ पेन्शन वाढणार नाही तर संदर्भ अटींमध्ये पेन्शनशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये चेंज पाहायला मिळणार आहे. पेन्शन, ग्रॅच्युइटी, कुटुंब पेन्शन आणि बदललेले पेन्शन पुनर्संचयित केली जाणार आहे. दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव सुद्धा समोर आला आहे.
शिवाय जुनी पेन्शन योजना (1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्यांसाठी) पुनर्संचयित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला आहे. सीजीएचएस वैद्यकीय सुविधा, कॅशलेस उपचार आणि महागाई भत्ता (डीए/डीआर) पगार आणि पेन्शनमध्ये एकत्रित करणे बाबत सुद्धा सकारात्मक निर्णयाची आशा आहे.
ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंग पटेल सांगतात की फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितका पेन्शनमध्ये फायदा होणार आहे. कम्युटेशन कालावधी 15 वर्षांवरून 12 वर्षांपर्यंत कमी केला पाहिजे, कारण सध्या पेन्शनमधून 40% कपात केली जाते.
सीजीएचएस रुग्णालये प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. सध्या, वैद्यकीय लाभ फक्त 3 हजार प्रति महिना आहेत; ते वाढवून वीस हजार रुपये करण्याची मागणी उपस्थित करण्यात आली आहे. यामुळे आता नेमका आठव्या वेतन आयोगात कोण कोणता लाभ मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.













