8th Pay Commission : सद्यस्थितीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जातोय. दरम्यान 2026 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना आठव्या वेतन आयोगातून पगार मिळणार आहे. भारत सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती.
ही घोषणा झाल्यानंतर आता तब्बल दहा महिन्यांनी केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन आयोगासाठीच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यात आली आहे. तसेच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाली आहे.

नव्या वेतन आयोगाच्या तीन सदस्य समितीची स्थापना झाल्यानंतर पुन्हा एकदा आठवा वेतन आयोग चर्चेत आला असून नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार दुप्पट होणार अशा काही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे सुरू आहेत.
पण खरंच आठवावेतन आयोग तुमचा पगार दुप्पट करणार का हा महत्त्वाचा सवाल आहे आणि आज आपण याच संदर्भातील माहिती आजच्या या लेखातून समजून घेणार आहोत.
फिटमेंट फॅक्टरची होत आहे चर्चा
आठव्या वेतन आयोगाला अधिकृतरित्या मंजुरी मिळाल्यानंतर सध्या सगळे कडे फिटमेंट फॅक्टर बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण हा फिटमेंट फॅक्टर काय असतो? तर हा एक गुणांक असतो. कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शन धारकांच्या बेसिक पगाराला या गुणांकाद्वारे गुणले जाते आणि येणारी रक्कम नवीन बेसिक पगार असतो.
थोडक्यात आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन किती असणार हे ठरवण्याचे काम हा फॅक्टर करणार आहे. पण हा फॅक्टर किती असेल हे कोण ठरवेल तर आयोग ठरवेल. दरम्यान मागील सातव्या वेतन आयोगात आयोगाने फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवला होता.
यामुळे आठव्या वेतन आयोगात हा फॅक्टर किती असणार यावरच सर्व गणित अवलंबून असणार आहे. पण मीडिया रिपोर्ट मध्ये वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. चर्चांवर विश्वास ठेवला तर यावेळी फिटमेंट फॅक्टर 2.11 असू शकतो.
आता समजा नव्या वेतन आयोगात समितीने फिटमेंट फॅक्टर 2.11 ठरवला तर ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 35 हजार रुपये आहे त्याचा मूळ पगार 73 हजार 850 रुपये (35000×2.11) होणार आहे. अर्थातच हा पगार तुम्हाला दुप्पट दिसतोय. पण या मागचं कॅल्क्युलेशन थोडं वेगळं आहे.
खरे तर कर्मचाऱ्यांना फक्त पगारच मिळत नाही तर त्यासोबत घरभाडे भत्ता, महागाई भत्ता असे भत्ते पण मिळतात. यातील घर भाडे भत्ता हा लगेचच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढवून मिळतो. पण महागाई भत्ता नव्या वेतन आयोगात शून्य केला जाणार आहे. फिटमेंट फॅक्टरचा मूळ पगारावर तसेच घरभाडे भत्त्यावर परिणाम होतो.
पण त्याचवेळी महागाई भत्ता शून्य केला जाईल. थोडक्यात नवीन वेतन आयोगात तुमचा पगार दुप्पट होतोय असे तुम्हाला वाटत असले तरीसुद्धा प्रत्यक्षात पगारात तुम्हाला 20 ते 25 टक्के एवढीच वाढ मिळणार आहे.
आता तर समजा फिटमेंट फॅक्टर 2.0 झाला तर 50000 मूळ पगार असणाऱ्याचा मूळ पगार एक लाख रुपये होईल. अशातच आता काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये यावेळी कनिष्ठ स्तरावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडा अधिक फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वेतनातील तफावत दूर करण्यासाठी सरकारचा सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जात आहे. पण या संदर्भातील कोणतीच अधिकृत माहिती अजून हाती आलेली नाही. यामुळे नेमकं नव्या वेतन आयोगात काय होणार हे पाहणे खरंच उत्सुकतेचे राहणार आहे.













