Share Market Tips : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गुंतवणूकदारांना आता चारशे रुपयांचा स्टॉक फक्त 40 रुपयांमध्ये खरेदी करण्याची एकच सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. नक्कीच ज्या गुंतवणूकदारांना त्यांचा पोर्टफोलिओ आणखी वाढवायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.
खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वितरण केले आहे. याशिवाय काही कंपन्यांनी लाभांश वितरण केले आहे तर काही कंपन्यांचे स्टॉक स्प्लिट झाले आहेत. खरे तर गुंतवणूकदार नेहमीच अशा कॉर्पोरेट लाभाच्या घोषणा करणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात.

दरम्यान तुम्ही पण अशा कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्केटमध्ये लिस्टेड ए 1 लिमिटेड कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चारशे रुपयांचा स्टॉक फक्त 40 रुपयांमध्ये मिळणार आहे.
खरे तर कंपनी स्टॉक स्प्लिट म्हणजेच शेअरचे विभाजन करून जे रिटेल गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी शेअरची खरेदी सोपी बनवत आहे. दरम्यान, आता आपण कंपनीच्या स्टॉक स्प्लिटच्या घोषणेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कंपनीने स्टॉक स्प्लिट साठी काय रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे ? कंपनी आपल्या शेअरचे विभाजन किती शेअर्स मध्ये करणार या सगळ्या गोष्टी आज आपण येथे जाणून घेणार आहोत.
कशी आहे कंपनीची योजना?
A-1 लिमिटेडच्या संचालक मंडळानेStock Split च्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली असून या अंतर्गत कंपनीच्या माध्यमातून 1:10 च्या प्रमाणात शेअर्सचे विभाजन केले जाणार आहे. यामुळे तरलता वाढणार असून या निर्णयाचा रिटेल गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या घोषणेमुळे आता 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेला कंपनीचा एक स्टॉक आता 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभागला जाणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे यासाठीची रेकॉर्ड तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. खरंतर या कंपनीने अलीकडेच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे वाटप केले होते. 31 डिसेंबर 2025 रोजी कंपनीने बोनस इशू साठी ट्रेड केले होते. आता कंपनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी स्टॉक स्प्लिट करणार आहे. यासाठी 8 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख निश्चित झाली असल्याची माहिती संचालक मंडळाकडून समोर आली आहे.
शेअरची कामगिरी कशी आहे?
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या हा स्टॉक 458 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. महत्त्वाची बाब अशी की या शेअर्समध्ये मागील 60 महिन्यांच्या काळात म्हणजेच पाच वर्षांच्या काळात 950 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अर्थात मागील पाच वर्षात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 950% रिटर्न मिळाले आहेत. तसेच मागील एका वर्षात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 350% इतका रिटर्न मिळाला आहे.











