गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब…बिटकॉइनमध्ये मोठी घसरण… कारण आले समोर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनने दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जवळपास 20 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ते सुमारे 11 टक्क्यांनी घसरले आणि सध्या $56,868 वर व्यापार करत आहे. 10 नोव्हेंबर रोजी 68 हजार 789.63 डॉलरचा उच्चांक गाठल्यानंतर, त्यात घसरण सुरू झाली.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, बिटकॉइनमध्ये ही घसरण उच्चस्तरावरील नफावसुलीमुळे दिसून आली आहे. दरम्यान, Dogecoin किंमत 7 टक्क्याने वाढून 0.23 डॉलरवर पोहोचली.

शिबा इनूमध्ये देखील 15 टक्क्याने वाढ झाली असून 0.000049 डॉलरवर आहे. त्याचप्रमाणे इतर क्रिप्टोकरन्सी लाइटकॉइन, एक्सआरपी, पोल्काडॉट, स्टेलर, कार्डानो, सोलानाच्या किमतीही वाढल्या आहेत.

दुसरीकडे, भारत आता क्रिप्टो कायद्याचा विचार करत आहे, जो संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सादर केला जाऊ शकतो.

त्याच वेळी, या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या भारतीय एक्सचेंजेसनी त्यांचे सार्वजनिक-आउटरीच ऑपरेशन्स थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News