Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील 11 रेल्वे स्थानकांमधून धावणाऱ्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला रेल्वे प्रशासनाकडून मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे.
गुजरात आणि ओडिशा या दोन राज्यांना जोडणाऱ्या या विशेष गाडीला मुदतवाढ मिळाली असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ओडिशा येथील खुर्दा रोड ते गुजरात राज्यातील सुरज जवळील उधना रेल्वे स्थानकादरम्यान विशेष गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता.
उधना ते खुर्दा रोड यादरम्यान चालवली जाणारी साप्ताहिक विशेष गाडीची मुदत येत्या काही दिवसांनी संपणार होती आणि मुदत संपण्याआधीच आता रेल्वे प्रशासनाने या रेल्वे गाडीच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या आहेत. अर्थात या विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
किती दिवसांची मुदतवाढ मिळाली?
खरंतर उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत सुरू करण्यात आलेली ही विशेष गाडी डिसेंबर अखेरपर्यंत चालवण्यात येणार अशी माहिती समोर आली होती. मात्र आता या गाडीला मुदतवाढ मिळाली आहे. आता ही विशेष रेल्वे गाडी प्रवाशांच्या प्रतिसादामुळे फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत चालवण्यात येणार आहे.
खरे तर या गाड्या विशेष भाड्याने चालवल्या जात आहेत. म्हणजेच या रेल्वे गाडीचे तिकीट दर या मार्गावर धावणाऱ्या इतर रेल्वे गाड्यांच्या तुलनेत अधिक राहणार आहे. मात्र असे असतानाही या रेल्वे गाडीला प्रवाशांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळतोय आणि म्हणूनच आता प्रशासनाने या विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे
आणि या निर्णयाचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे उधना ते खुर्दा रोड साप्ताहिक विशेष रेल्वे आता 25 फेब्रुवारीपर्यंत चालवली जाणार आहे. तसेच खुर्दा रोड ते उधना साप्ताहिक विशेष रेल्वे आता 27 फेब्रुवारी पर्यंत रुळावर धावताना दिसणार आहे.
या स्टेशनवर थांबणार विशेष रेल्वे
व्यारा, नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, तुमसर रोड, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलागड, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पालासा, ब्रह्मपूर आणि बालुगाव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर साप्ताहिक विशेष गाडीला थांबा मंजूर झाला असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.












