1600 रुपयांचा स्टॉक एका दिवसात 1500 रुपयांवर ; मुकेश अंबानीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये आठ महिन्यातील सर्वात मोठी घसरण, कारण…

Published on -

Mukesh Ambani Share Price : आज मंगळवारी शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मागील 2025 हे संपूर्ण वर्ष शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून चढ उताराचे राहिले. गेल्या वर्षी अनेक शेअर्समधून गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न मिळालेत आणि यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले.

हेच कारण आहे की अजूनही शेअर मार्केट गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत आणि मार्केट आता पुढे नेमकं कसं राहणार? हाच सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित होतोय. अशातच आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या आठ महिन्यातील सर्वात मोठी घसरण आज मंगळवारी नोंदवण्यात आली.

यामुळे संबंधित कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मागील आठ महिन्याच्या कंपनीचे शेअर्स पहिल्यांदाच एका दिवसात आठ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. हा स्टॉक सोमवारी 1577 रुपयांच्या रेंजमध्ये क्लोज झाला होता. पण आज मार्केट बंद होताना या स्टॉक ची किंमत 1497 रुपयांच्या रेंजमध्ये पाहायला मिळाली. अर्थात एका दिवसातच या स्टॉकच्या किमतीत 5 टक्क्यांची घसरण झाली आणि यामुळे या घसरणीचे नेमके कारण काय असा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित होऊ लागला.

खरे तर आज जेव्हा हा स्टॉक ओपन झाला तेव्हा याची किंमत 1575 रुपये होती म्हणजेच किरकोळ घसरणीसह हा स्टॉक ओपन झाला होता. मात्र मार्केट ओपनिंगला किरकोळ दिसणारी घसरण नंतर शेअर्समध्ये सतत विक्री सुरू राहिल्याने अधिक वाढत गेली.

या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या मार्केट कॅपिटल मध्ये एक लाख कोटी रुपयांची मोठी कपात नमूद करण्यात आली असून याचा गुंतवणूकदारांना पण मोठा फटका बसला आहे. दरम्यान आता आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या मागील एका वर्षाच्या कामगिरीवर नजर टाकूयात.

स्टॉक एक्सचेंज कडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मागील बारा महिन्यांमध्ये या कंपनीच्या शेअर्स मध्ये जवळपास 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांच्या काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 12 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

पण मागील एका महिन्यात कंपनीचे शेअर्स 0.55 टक्क्यांनी घसरले आणि गेल्या पंधरा दिवसांच्या काळात या कंपनीचे शेअर्स जवळपास अडीच टक्क्यांनी घसरलेत. तसेच मागील एका आठवड्याच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 0.54 टक्क्यांची घसरण नमूद करण्यात आली आहे.

आता मंगळवारी या शेअरच्या किमतीत एकाच दिवसात पाच टक्क्यांची घसरण झाली. आता आपण या शेअर्समध्ये घसरण का होत आहे याचा आढावा घेऊयात. खरे तर मागील काही दिवसांपूर्वी ‘ब्लूमबर्ग’चा एक अहवाल समोर आला होता. यात रशियन तेलाचे सर्वात मोठी खरेदीदार असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जामनगर येथील रिफायनरीकडे रशियन तेलाने भरलेली तीन जहाज येताय तसा दावा करण्यात आला होता.

मात्र रिलायन्सकडून हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जानेवारी महिन्यात रशियन कच्चा तेलाचा कोणताच पुरवठा होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. तसेच गेल्या तीन आठवड्यात कंपनीला रशियन तेलाचा कोणताच पुरवठा झालेला नाही असे सुद्धा कंपनीकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे.

थोडक्यात मध्यंतरी जो दावा केला जात होता तो पूर्णतः तेही नसल्याचे कंपनीकडून सांगितले गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर रिलायन्सने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

खरे तर भारताने रशियन तेलाची खरेदी केली तर टेरिफ वाढवणार अशी खुली धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे हे स्पष्टीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान याच घटनेमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर्समध्ये आता घसरण होत असल्याचा दावा काही तज्ञांकडून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News