Marathi News : पृथ्वीवरचे भीषण संकट टळले आहे. पृथ्वीला एका मोठ्या खगोलीय आपत्तीचा फटका बसणार होता, मात्र, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच उल्कापिंडाचा (लघुग्रह) स्फोट झाल्याने या महाभयंकर खगोलीय संकटातून पृथ्वी वाचली आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, २१ जानेवारी २०२४ ला बर्लिनजवळ पृथ्वीच्या वातावरणात लघुग्रहाचा स्फोट झाला. तेव्हा शास्त्रज्ञांना या घटनेची माहिती मिळाली. ही उल्का जमिनीवर पडली असती, तर बर्लिन शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असता.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी उल्का दिसण्याची इतिहासातील ही आठवी वेळ आहे. काही तासांतच ही उल्का जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील लाइपझिग नावाच्या परिसरात आकाशातून झेपावली. परंतु, ती एका मोठ्या स्फोटासह लख्ख प्रकाशानंतर तत्काळ नष्ट झाली.
आता शास्त्रज्ञ तिचे तुकडे शोधत आहेत. जर्मनीत रविवार, २१ जानेवारी २०२४ ला सकाळच्या सुमासार अचानक एक तेजस्वी प्रकाश आकाश फाडून पृथ्वीच्या वातावरणावर आदळल्याने त्याचा भीषण स्फोट झाला मात्र कोणाला काही कळण्याच्या आत हा लख्ख प्रकाश अदृश्यही झाला.
या घटनेच्या काही तासांपूर्वीच शास्त्रज्ञांनी या उल्कापिंडाचा मागोवा घेतला होता. सुदैवाने ही उल्का आकाराने लहान होती जर ती आकाराने मोठी अथवा धातूयुक्त खनिजांनी बनलेली असती तर तिच्यामुळे पृथ्वीवर भयंकर विध्वंस झाला असता, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
या उल्कापिंडाच्या आघातामुळे लाइपझिग किंवा बर्लिन शहराच्या आसपासचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता. युरोपियन युनियनमधील अनेक देशांमध्येही या उल्कापिंडाचा परिणाम दिसून आला. ते समुद्रात पडले असते तर सुनामीने अनेक शहरांना तडाखा दिला असता.
हा लघुग्रह क्रिश्चियन सार्नेज्की यांनी हंगेरीतील पिस्नकेस्टेटो माऊंटन स्टेशन येथील कोन्कोली वेधशाळेतून पहिल्यांदा पाहिला होता. त्याचे नाव ‘२०२४ बीएकआय’ असे ठेवण्यात आले होते. दरम्यान, उत्तर जर्मनीतील लाइपझिग शहरातील एका कॅमेऱ्याने ही उल्का येताना,
जळतानाचे दृश्य टिपले. पृथ्वीच्या वातावरणात येताच तिचा स्फोट व त्यानंतर जळून नष्ट झाल्याचे दृश्यही कॅमेऱ्याने टिपले आहे. हे सर्व काही सेकंदातच घडले. या उल्कापिंडाची रुंदी ३.३ फूट होती. ते बर्लिनपासून सुमारे ५० किलोमीटर उंचीच्या आकाशात पश्चिम दिशेने वातावरणात आले. त्यानंतर ते जळून नष्ट झाले. आता शास्त्रज्ञ त्याचे तुकडे शोधत आहेत.