Juliet Rose : गुलाबाचे फूल हे खास मानले जाते. जगभरात गुलाबाच्या अनेक जाती आहेत. लाल, गुलाबी, सफेद आणि काळ्या रंगाचाही गुलाब आहेत हे आपण सारेच जाणतो. रुप-रंग आणि सुगंधाचा दरवळ यासाठी गुलाबाचे फूल विशेष लोकप्रिय आहे.
याच गुलाबाची एक प्रजाती मात्र अन्य गुलाबांच्या तुलनेने अत्यंत दुर्मिळ मानली जाते. याचे कारण असे की हे गुलाब १५ वर्षांतून एकदाच उमलते. ते आपला आकर्षक रंग आणि मनमोहक सुगंधासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

गुलाबाच्या या दुर्मिळ प्रजातीचे नाव आहे ‘ज्युलिएट रोझ’. असे सांगितले जाते की, या एका गुलाबाच्या फुलाची किंमत काही लाख नव्हे तर चक्क काही कोटी रुपये असते. अर्थात याला अधिकृतरित्या काही ठोस आधार नाही.
मात्र, एवढे निश्चित सांगता येते की ज्युलिएट रोझ हे अत्यंत दुमिळ असल्याने धनाढ्य लोकांमध्ये त्याची मोठी क्रेझ आहे. ज्युलिएट रोझ विकत घेण्यासाठी धनाढ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते.
‘फायनान्स ऑनलाइन’ या वेबसाईटने ज्युलिएट गुलाबाबद्दलची ही माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ज्युलिएट रोझ हे गुलाब सर्वप्रथम सन २००६ मध्ये पाहण्यात आले होते. डेव्हिड ऑस्टिन नावाच्या व्यक्तीने अथक प्रयत्नांती हे गुलाब हे फुलवले होते.
झाडाची वाढ पूर्ण झाल्यापासून जवळपास १५ वर्षे त्याची देखभाल करावी लागते. त्यानंतर कुठे ज्युलिएट रोझ उगवते. उत्तमोत्तम गुलाबांच्या काही जातींच्या संकरातून ज्युलिएट रोझ प्रजाती तयार करण्यात आली आहे.
• शेक्सपियरच्या ‘रोमिको अँड ज्युलिएट’ या नाटकावरून नाव
• जगातील सर्वांत महागडे फूल
•१५ वर्षांच्या मेहनतीने फलवली नवीन जात
• गुलाबाची ही जात तयार करण्यासाठी तब्बल ३० लाख बिटीश पाऊंड खर्च
• डेव्हिड ऑस्टिन याने शोधल्या २०० हून अधिक गुलाब फुलांच्या जाती