Aadhar And Pan Card : देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. या कागदपत्राविना भारतात कोणतेच काम करता येणे शक्य नाही. दरम्यान देशभरातील पॅन आणि आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
नव्या वर्षात काही लोकांचे आधार आणि पॅन कार्ड डी ऍक्टिव्हेट करण्यात येणार अशी माहिती समोर येत आहे. अशा स्थितीत आता आपण नेमक्या कोणत्या लोकांचे आधार आणि पॅन कार्ड नव्या वर्षात डी ऍक्टिव्हेट होणार या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आधार कार्ड हा भारतीय नागरिकांचा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. त्याचवेळी पॅन कार्ड हा एक महत्त्वाचा वित्तीय पुरावा आहे. देशातील जवळपास प्रत्येकच वित्तीय कामासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.
आर्थिक कामासाठी महत्त्वाचे ठरणारे हे पॅन कार्ड आता केंद्रातील मोदी सरकारने आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान शासनाने या मुदतीत जे लोक आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणार नाहीत त्यांचे दोन्ही कागदपत्र म्हणजेच आधार सोबतच पॅन कार्ड डीऍक्टिव्हेट अर्थात निष्क्रिय करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
यामुळे ज्या लोकांनी अद्याप आपले पॅन कार्ड आधारसोबत लिंक केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे जेणेकरून त्यांचे आधार आणि पॅन दोन्ही कार्ड ऍक्टिव्ह राहतील. दरम्यान आता आपण आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
कशी आहे लिंकिंग ची प्रोसेस
पॅन कार्ड आधार सोबत लिंक करायचे असल्यास सर्वप्रथम पॅन कार्ड धारकांना आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. www.incometaxindiaefiling.gov.in ही आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर डावी बाजूला असणाऱ्या क्विक लिंक या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर लिंक आधारावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर,
आधार नंबर आणि आधार कार्डमध्ये नोंदणीकृत नाव प्रविष्ट करावे लागणार आहे. यानंतर, अटी आणि शर्तींवर ओके क्लिक करायचे आहे. मग कॅप्चा कोड भरून तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक करू शकता.













