1 नोव्हेंबरपासून आधारकार्डशी निगडित 3 महत्वाचे नियम बदलले जाणार ! काय परिणाम होणार ? 

Published on -

Aadhar Card News : उद्यापासून नवीन महिन्याला सुरुवात होणार आहे. उद्या नोव्हेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आणि या दिवशी अनेक नियम बदलणार आहेत. पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये उद्या बदल होतील. नेहमीप्रमाणे उद्या 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमतीत तसेच 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल अपेक्षित आहे.

याशिवाय नोव्हेंबर महिन्यात आधार कार्डशी निगडीत तीन महत्त्वाचे नियम बदलले जाणार आहेत. दरम्यान आज आपण पुढील महिन्यात आधार कार्ड संबंधित कोणते महत्त्वाचे नियम बदलणार आहेत याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. 

आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग बंधनकारक – शासनाने पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे. जे लोक आपले पॅन कार्ड आधार सोबत लिंक करणार नाही त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आधार पॅन कार्ड लिंकिंग साठी आता फक्त 60 दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग साठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत जे लोक आपल पॅन कार्ड आधार सोबत लिंक करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे.

त्यामुळे जर तुम्हीही अद्याप हे प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करायचे आहे. जे नागरिक पॅन कार्ड आधार सोबत लिंक करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड एक जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. 

केवायसी साठी तीन पद्धती – शासनाने आता केवायसी ची प्रक्रिया फारच सोपी केली आहे. केवायसी आता तीन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. आधार ओटीपी पडताळणी, व्हिडिओ केवायसी किंवा समोरासमोर पडताळणी या तीन पद्धतींच्या माध्यमातून केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करता येईल अशी माहिती शासनाने दिली आहे. यामुळे केवायसी प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहित होईल आणि सर्वसामान्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करता येणार – एक नोव्हेंबर पासून आधार कार्ड धारकांना अनेक गोष्टी ऑनलाईन अपडेट करता येणार आहेत. नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबरमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची असल्यास आता हे काम तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

आधी या कामांसाठी आधार केंद्रावर जावे लागत. परंतु एक नोव्हेंबर पासून या गोष्टी ऑनलाइन होणार आहेत. UIDAI ने यासाठी एक विशेष प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News