…..तर आधार कार्ड धारकांना ‘इतका’ दंड भरावा लागणार ! वाचा सविस्तर

दहा वर्षांहून अधिक काळ जुने आधार कार्ड वापरणाऱ्यांना आपले आधार अपडेट करावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला एक रुपया देखील खर्च येत नाही. जर तुम्ही माय आधार पोर्टलवर स्वतः आधार कार्ड अपडेट केले तर तुम्ही निशुल्क हे आधार कार्ड अपडेट करू शकता.

Tejas B Shelar
Updated:
Aadhar Card News

Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा सरकारी ओळखीचा पुरावा जवळपास सर्वच कामांमध्ये उपयोगी पडतो. कोणतेच शासकीय आणि निमशासकीय काम आधार कार्ड विना पूर्ण होऊ शकत नाही.

अहो भारतात एक साधे सिम कार्ड जरी काढायचे असेल तरी देखील आधार कार्ड लागते. सोबतच वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, शासकीय कामांमध्ये, बँकिंग कामांमध्ये, शाळेत अशा विविध ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असते.

विविध प्रकारचे डॉक्युमेंट काढण्यासाठीही आधार कार्ड लागते. जसे की पॅन कार्ड आणि मतदान कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. मात्र जर तुम्ही तुमचे आधार कार्ड फार आधीच बनवलेले असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

दहा वर्षांहून अधिक काळ जुने आधार कार्ड वापरणाऱ्यांना आपले आधार अपडेट करावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला एक रुपया देखील खर्च येत नाही. जर तुम्ही माय आधार पोर्टलवर स्वतः आधार कार्ड अपडेट केले तर तुम्ही निशुल्क हे आधार कार्ड अपडेट करू शकता.

14 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला माय आधार पोर्टलवर निशुल्क आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. पण 14 सप्टेंबर नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दंड द्यावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला पन्नास रुपये एवढे शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

यामुळे ज्या लोकांचे आधार कार्ड फार जुने असेल आणि ज्यांनी अजून त्यांचे आधार अपडेट केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

ऑनलाईन आधार कसे अपडेट करावे

myaadhaar.uidai.gov. या वेबसाइटवर जाऊन 14 सप्टेंबर पर्यंत फुकटात आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक वापरून लॉग इन करायचे आहे. यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल.

तुमच्या मोबाईलवर पाठवलेला वन टाइम पासवर्ड तुम्ही दिलेल्या रकान्यात भरल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमची माहिती दिसेल. ही माहिती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे. मग जर सर्व माहिती योग्य असेल तर ‘I verify that the above details are correct.’ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

जर तुम्हाला माहिती अपडेट करायची असेल तर मेनूमधून माहिती अपलोड करायची आहे. प्रत्येक फाइल 2 MB पेक्षा कमी आणि JPEG, PNG किंवा PDF फॉरमॅटमध्ये असल्याची खात्री करावी. निवडलेले कागदपत्र अपलोड करा. सर्व माहिती पुन्हा तपासा. मग सबमिट बटणवर क्लिक करा. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच आधार कार्ड अपडेट करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe