महत्वाची बातमी ! आता व्हाट्सअपवर मिळणार Aadhar Card, सरकारने सुरू केली नवीन सुविधा

Published on -

Aadhar Card : केंद्रातील सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हा निर्णय आधार कार्ड धारकांसाठी खास ठरणार आहे. आता नागरिकांना व्हाट्सअपवर आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे.

यासाठी सरकारकडून एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. खरंतर अलीकडे सोशल मीडिया एप्लीकेशनचा वापर प्रचंड वाढला आहे. देशात व्हाट्सअप वापरणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे.

यामुळे आता व्हाट्सअपवर आधार कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आधी नागरिकांना UIDAI पोर्टल किंवा डिजिलॉकर अॅपवर जावे लागत. पण आता व्हॉट्सअॅपवर MyGov Helpdesk चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे.

यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी आधार कार्डसह डिजिलॉकरशी संलग्न महत्त्वाची कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. जे लोक व्हाट्सअप वापरतात त्यांच्यासाठी नक्कीच ही सुविधा उपयुक्त राहील.

आता नागरिकांना whatsapp वरून अवघ्या काही सेकंदात आधार कार्डची पीडीएफ डाऊनलोड करता येईल. पण यासाठी नागरिकांचे डिजिलॉकरवर अकाउंट असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर रजिस्टर असायला हवा.

व्हाट्सअप वरून आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागणार आहे. तुमच्या फोन बुक मध्ये हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप वर जायचे आहे. येथे तुम्हाला या नंबर वर Hi मेसेज टाकावा लागेल.

मग तुम्हाला मेनू पर्याय सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डीजीलॉकर अकाउंट व्हेरिफाय करावे लागेल. अकाउंटचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले की आपल्या आधार क्रमांकाचे 12 अंक टाकावे लागतील.

यानंतर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी तुम्हाला येथे टाकावा लागेल. मग पुन्हा एकदा तुमची व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि यानंतर तुमचे उपलब्ध डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसतील.

यातून तुम्हाला आधार कार्डचा पर्याय निवडायचा आहे. बस एवढी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला आधार कार्डचे पीडीएफ डाऊनलोड करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या डिजिलॉकर सोबत आधार कार्ड जोडायचे आहे.

एकंदरीत आता जर तुम्ही कुठे बाहेर असाल आणि आधार कार्ड सोबत नसेल तर तुम्ही या सुविधेचा वापर करून सहजतेने आधार कार्ड डाउनलोड करू शकता. ज्या लोकांना यूआयडीएआय च्या वेबसाईटवर तसेच डिजिलॉकरवर आधार कार्ड डाऊनलोड करता येत नसेल त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त असेल. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe