आयुष्मान भारत योजनेतुन ‘या’ आजारावरवर मिळतो मोफत उपचार !

Published on -

Aayushman Bharat Yojana : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात शेकडो योजनांचा शुभारंभ केला आहे. अजूनही केंद्रातील सरकार नवनवीन योजना आणतच आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी शासनाकडून हा प्रयत्न केला जातोय.

आरोग्य विषयक देखील अनेक योजना आपल्या देशात कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 2018 मध्ये सुरू केलेली आयुष्मान भारत अर्थातच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सुद्धा अशीच एक आरोग्यविषयक योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मोफत उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ही देशातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सुद्धा ठरली आहे.

या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळत आहेत आणि यामुळे ही योजना दिवसेंदिवस हिट होताना दिसत आहे. याचा सरकारला निवडणुकीत पण फायदा होतोय.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना किफायतशीर वैद्यकीय उपचारांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे. योजनेचा मुख्य उद्देश गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि उपचारांच्या खर्चामुळे कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये हा आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. विशेष म्हणजे ही रक्कम संपूर्ण कुटुंबासाठी आहे. कुटुंबातील कितीही सदस्यांना उपचारांची गरज भासली तर ते 5 लाखांच्या मर्यादेत कुठल्याही वेळी उपचार घेऊ शकतात.

उपचारांची संख्या निश्चित नसून केवळ विम्याची मर्यादा प्रभावी मानली जाते. आयुष्मान कार्ड मिळाल्यानंतर देशभरातील हजारो सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार मोफत मिळू शकतात. हार्ट वाल्व रिप्लेसमेंट, पेसमेकर इम्प्लांटेशन, रेनल ट्रान्सप्लांटेशन, कॅन्सर उपचार, कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन अशा जटिल शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांवरील उपचार यात समाविष्ट आहेत.

मात्र, साध्या तपासण्या, OPD, एक्स-रे किंवा रुटीन चेकअपसारख्या सेवा या कव्हरमध्ये येत नाहीत. योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली आहे. नागरिकांना कोणत्याही एजंटकडे जाण्याची किंवा लांब रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही.

Ayushman App डाउनलोड करून मोबाईलवरूनच लाभार्थी शोधणे, आधारद्वारे पडताळणी करणे आणि e-KYC पूर्ण करणे शक्य झाले आहे. पात्रता निश्चित झाल्यानंतर सात दिवसांत कार्ड तयार होते आणि ते थेट अॅपमध्ये उपलब्ध होते. सरकारचा दावा आहे की योजनेमुळे आतापर्यंत लाखो कुटुंबांना महागड्या उपचारांचा खर्च टाळता आला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या योजनेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही योजना सामाजिक सुरक्षेच्या दिशेने सरकारची मोठी पावले मानली जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe