अबुधाबी सर्वात सुरक्षित शहर,यादीत महाराष्ट्रातील ३ शहरे ! ३८२ शहरांच्या जागतिक क्रमवारीत १९ भारतीय शहरांना स्थान

Sushant Kulkarni
Published:

२१ जानेवारी २०२५ : अबुधाबी: संयुक्त अरब अमिरात (यूएई) मधील अबुधाबी हे सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. टॉप पाचमध्ये यूएईतील चार शहरांचा समावेश आहे.३८२ शहरांच्या क्रमवारीत १९ भारतीय शहरे असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, पुणे आणि मुंबईचा समावेश आहे.तर दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिझवर्ग हे सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे.

ऑनलाइन डेटाबेस ‘नंबीओ’कडून गुन्हेगारी घटनांच्या आधारावर वर्ष २०२५ मधील जगभरातील सुरक्षित शहरांची रैंक जारी करण्यात आली.यूएईतील अबुधाबी हे सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे.यापाठोपाठ यूएईतील दुबई, शारजा, रस अल खैमाह ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.तर तैवानची राजधानी तैपेई हे शहर सुरक्षेच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.

३८२ शहरांच्या क्रमवारी १९ भारतीय शहरांचा समावेश आहे.भारतापुरता विचार केल्यास यादीत मंगळुरू हे सुरक्षेच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत ४८ वे तर भारतातील पहिले शहर ठरले आहे.यापाठोपाठ वडोदरा (रैंक-८५),अहमदाबाद (९०), सुरत (१०५), जयपूर (११५), नवी मुंबई (१२४), तिरुवनंतपुरम (१४५), चेन्नई (१५१), पुणे (१६२), हैदराबाद (१७३), चंदीगड (१७४), मुंबई (१८३), कोलकाता (२०५), इंदौर (२२६), गुडगाव (२६६), बंगळुरू (२७३), नोएडा (२८१), गाझियाबाद (३०८), दिल्ली (३०९) या शहरांचा समावेश आहे.

रैंकिंगमध्ये इस्लामाबाद (९३), लाहौर (१३१), रावळपिंडी (२४९), कराची (२९९) या चार पाकिस्तानी शहरांचा देखील समावेश आहे. अमेरिकेतील ४४, ब्रिटनमधील १८ आणि चीनमधील ५ शहरे रैंकिंगमध्ये आहेत.यादीतील सर्वात तळाच्या म्हणजे जगातील सर्वात असुरक्षित शहरांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील तीन शहरे आहेत.

सर्वात खालच्या पायरीवर म्हणजे ३८२ व्या स्थानावर आफ्रिकेतील पीटरमॅरिझबर्ग हे शहर आहे. तत्पूर्वी आफ्रिकेतील प्रिटोरिया (३८१), व्हेनेझुएलातील काराकस (३८०), पापुआ न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी (३७९) आणि आफ्रिकेतील जोहन्सबर्ग (३७८) ही शहरे यादीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe