अदानींचा ‘हा’ स्टॉक 50 टक्क्यांनी घसरला, एक्सपर्ट म्हणतात घसरतोय तरी खरेदी करा ! टार्गेट प्राईस आताच नोट करा

अदानी समूहाचे अनेक स्टॉक सध्या शेअर बाजारात दबावात आहेत. अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे शेअर्स सुद्धा सध्या दबावात आहेत. यात जवळपास 50 टक्क्यांची घसरण झालीये. मात्र लवकरच हा स्टॉक शेअर बाजारात तेजीत येण्याची शक्यता आहे. यामुळे जरी हा स्टॉक सध्या घसरत असला तरी देखील टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 675 रुपयांवर ट्रेड करतोय, मात्र भविष्यात हा स्टॉक 930 रुपयांपर्यंत जाणार असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.

Tejas B Shelar
Published:

Adani Group Stock : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असून या घसरणीचा अदानी समूहाच्या काही शेअर्समध्ये सुद्धा घसरण झाली आहे. एकीकडे शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असतांना आता अदानी समूहाचा एक स्टॉक लवकरच आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे शेअर्स आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असे बोलले जात आहे. खरेतर, आतापर्यंत हे शेअर्स आपल्या ऑगस्ट 2024 मधील उच्चांकी पातळीवरून 50 टक्क्यांनी घसरले आहेत.

आज 21 फेब्रुवारी 2025 रोजी देखील या कंपनीचे स्टॉक घसरले आहेत. सध्या हा स्टॉक 675 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र असे असतानाच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ब्रोकरेजकडून या स्टॉकसाठी BUY रेटिंग देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची सर्व डिटेल जाणून घेणार आहोत. या स्टॉकसाठी टॉप ब्रोकरेज कडून काय टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

टॉप ब्रोकरेजचा सल्ला काय ?

सध्या अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मात्र शेअर्समधील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.

या स्टॉकसाठी एलारा सिक्युरिटीजनं BUY रेटिंग दिली आहे, अर्थातच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच यासाठी टॉप ब्रोकरेज कडून 930 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

ही टारगेट प्राईस सध्याच्या किंमतीपेक्षा 37% अधिक आहे. म्हणजे या स्टॉक मधून आगामी काळात गुंतवणूकदारांना 37% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.

म्हणजे अदानी समूहाच्या या स्टॉकमध्ये झालेली घसरण गुंतवणूकदारांसाठी एक संधी घेऊन आली आहे. पण हा स्टॉक खरंच आगामी काळात 930 रुपयांपर्यंत जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe