अदानी यांच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक घसरला! 53 रुपयांवर आला स्टॉक, तुम्हीही गुंतवणूक केली आहे का? पहा…

भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये काल थोडी सुधारणा झाली होती मात्र नंतर यामध्ये घसरण झाली. दरम्यान शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे स्टॉक शेअर बाजारात नकारात्मक परतावा देताना दिसत आहेत. 19 फेब्रुवारी 2025 रोजी समूहाच्या जवळपास 9 कंपन्याचे स्टॉक घसरले असून यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

Published on -

Adani Group Stock : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. काल 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात थोडीशी रिकव्हरी दिसून आली होती मात्र नंतर पुन्हा एकदा बाजार दबावात गेला. दरम्यान या शेअर बाजारातील घसरणीच्या काळात अनेक कंपन्यांचे स्टॉक दबावात असून यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होत आहे.

अदानी समूहाच्या काही कंपन्यांचे स्टॉक देखील सध्या शेअर मार्केटमध्ये दबावात आहेत. अदानी समूहातील सांघी इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक देखील सध्या दबावात आहे. या कंपनीच्या स्टॉक मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरन होत असून या स्टॉकने आता 52 वीक लो लेव्हल टच केली आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती कशी आहे आणि अदानी समूहाच्या दुसऱ्या कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्टॉकची शेअर बाजारातील स्थिती कशी आहे

संघी इंडस्ट्रीजच्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी 19 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 53.06 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. हा या स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. मात्र 19 फेब्रुवारीला हा स्टॉक 53.74 रुपयांवर क्लोज झाला आहे.

हा स्टॉक काल 1.36 टक्क्यांनी घसरला आहे. खरेतर, गेल्या वर्षी 21 फेब्रुवारी 2024 रोजी शेअरने 117 रुपयांचा उच्चांक गाठला होता. हा या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक होता.

आम्ही तुम्हाला सांगतो की या वर्षी शेअरने दुहेरी अंकांमध्ये नकारात्मक परतावा दिला आहे. तीन आणि सहा महिन्यांच्या कालावधीतला नकारात्मक परतावा 40% चा राहिला आहे.

यामुळे सध्या अदानी समूहाच्या या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. आता आपण अदानी समूहाच्या इतर काही प्रमुख कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी जाणून घेणार आहोत.

अदानी समूहाच्या इतर कंपन्यांच्या स्टॉकची स्थिती

19 फेब्रुवारी 2025 ला अदानी समूहाच्या आठ ते नऊ कंपन्यांचे स्टॉक घसरलेत. बीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला अदानी ग्रीन एनर्जीचे स्टॉक 3.75 टक्के, समूह प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे शेअर्स 1.78 टक्के, अंबुजा सिमेंट्सचे स्टॉक 1.36 टक्के,

एसीसीचे शेअर्स 0.93 टक्के, अदानी विल्मरचे स्टॉक 0.90 टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 0.81 टक्के, अदानी पॉवरचे स्टॉक 48 टक्के आणि पोर्टचे स्टॉक 48 टक्के घसरले आहेत.

तथापि, एनडीटीव्हीचे शेअर्स 1.35 टक्क्यांनी, अदानी टोटल गॅसचे शेअर्स 0.54 टक्क्यांनी वधारले सुद्धा आहेत. एकंदरीत शेअर बाजारातील घसरणीचा अदानी समूहाला मोठा फटका बसत असून समूहाच्या अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या शेअर बाजारात नकारात्मक परतावा देताना दिसत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe