Adani Group Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सतत घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीला सप्टेंबर 2024 मध्ये सुरुवात झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत बाजार पूर्णपणे दबावात आहे. शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना देखील मोठा फटका बसला आहे.
गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घसरणीच्या काळात अदानी समूहाचे देखील अनेक स्टॉकच्या किमती कमी झाले आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचे शेअर्स देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत.

या स्टॉकच्या किमतीत 50 टक्क्यांची घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. मात्र हा स्टॉक 50 टक्क्यांनी घसरला असला तरी देखील या स्टॉकसाठी ब्रोकरेज कडून सकारात्मक संकेत दिले जात आहेत.
हा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. यामुळे टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉक ला बाय रेटिंग देण्यात आली आहे.
अर्थातच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी काय टार्गेट प्राईस देण्यात आली आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडची सध्याची स्थिती
अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक सध्या शेअर बाजारात 668 रुपयांवर ट्रेड करतोय. 21 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारी हा स्टॉक 668 रुपयांवर क्लोज झाला होता. या दिवशी या स्टॉक मध्ये एक टक्क्याहून अधिकची घसरण झाली होती.
टॉप ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने अदानी समूहाच्या अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड च्या शेअर्ससाठी BUY रेटिंग दिली आहे. हा स्टॉक आगामी काळात चांगली कामगिरी करणार आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार असा दावा होतोय.
हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 37 टक्क्यांनी वाढणार असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. या स्टॉक साठी एलारा सेक्युरिटीजने 930 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.
एकंदरीत ब्रोकरेज कडून हा स्टॉक सध्या घसरत असला तरी देखील आगामी काळात यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे या कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी घसरण ही गुंतवणूकदारांसाठी एकाप्रकारे संधीच ठरणार आहे.