Adani Power Share Will Hike : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर शेअर बाजारातील नवीन वर्षाची सुरुवात चढउताराची राहिली आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना आता जवळपास संपण्यास जमा असून या काळात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळालाय.
मात्र या चढउताराच्या काळात अदानी पावर कंपनीचा शेअर आपल्या गुंतवणूकदारांची चांदी करणार असल्याचा अंदाज समोर येतोय. हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा देणार असल्याचा दावा तज्ञांकडून केला जात आहे.
हा स्टॉक आगामी काळात तेजीत येऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. अशा स्थितीत आज आपण हा स्टॉक आगामी काळात किती पर्यंत जाऊ शकतो, अर्थातच तज्ज्ञांनी यासाठी काय टार्गेट प्राईज दिली आहे? हा स्टॉक किती महिन्यात टारगेट प्राईज गाठू शकतो याबाबतचा तज्ञांचा सविस्तर अंदाज आता आपण समजून घेणार आहोत.
स्टॉकच्या किंमती किती वाढणार?
व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आपल्या एका रिपोर्टमध्ये अदानी पावर लिमिटेड कंपनीचा स्टॉक आगामी काळात तेजीत येणार असे संकेत दिले आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘अदानी पॉवर लिमिटेड कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर योजना आखत आहे.
या ब्रोकरेज फर्मने देशात कोळशाची उपलब्धता वाढत असल्याने आणि विजेचा वापर वाढत असल्याने कंपनीला याचा फायदा होईल असे सांगितल आहे. या ब्रोकरेज फर्मने सध्याचा अक्षय ऊर्जा स्त्रोत विजेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे निरीक्षण नोंदवले असून आगामी काळात देशांतर्गत विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी औष्णिक विजेची क्षमता अधिक वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे अदानी पॉवर कंपनी आपल्या मजबूत क्षमता विस्तार योजनेद्वारे वाढत्या मागणीचा फायदा उचलताना दिसणार आहे. म्हणूनचं व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी पॉवर कंपनी शेअरसाठी 806 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
म्हणजेच हा स्टॉक आगामी काळात 806 रुपयांवर जाऊ शकतो. शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा ही टार्गेट प्राईस 54 टक्क्यांनी अधिक आहे. नक्कीच या स्टॉक मध्ये जर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आणि आगामी काळात हा टॉप वाढला तर गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की या ब्रोकरेज फर्मने अदानी पॉवर पुढील 24 महिन्यांतच ही टार्गेट प्राईस गाठेल असं स्पष्ट केलं आहे. यामुळे खरंच येत्या दोन वर्षात ही टार्गेट प्राईज हा स्टॉक गाठणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.