पैसाच पैसा ! ‘या’ पिकाची लागवड तुम्हाला बनवणार श्रीमंत, 6 महिन्यातच होणार लाखोंची कमाई

जर तुम्हीही शेतकरी असाल आणि तुम्हाला पाच ते सहा महिन्यांच्या काळात लाखो रुपयांची कमाई करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण अशा एका पिकाची माहिती पाहणार आहोत ज्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येऊ शकते.

Published on -

Agricultural Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतकऱ्यांनी फक्त पारंपारिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवीन नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. फळ पिकांची तसेच फुल पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.

भाजीपाल्याच्या लागवडीलाही शेतकरी प्राधान्य दाखवत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगली मोठी कमाई सुद्धा होते. दरम्यान आज आपण अशा एका पिकाच्या लागवडी बाबत माहिती पाहणार आहोत यातून शेतकऱ्यांना अवघ्या पाच सहा महिन्यांच्या काळात लाख रुपयांची कमाई होणार आहे.

आळू लागवड बनवणार मालामाल

अलीकडे बाजारात आळूची मागणी वाढली आहे. यामुळे या पिकाची व्यावसायिक शेती होऊ लागली आहे. अळूमध्ये विटामिन ए, बी आणि सी असतात. यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात आढळतात.

यामुळे बाजारात अळूची मागणी वाढली आहे. परिणामी या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. अळूच्या पानांचा वापर वडी तयार करण्यासाठी केला जातो आणि त्याचे कंद उकडून खाल्ले जातात.

याची लागवड प्रामुख्याने आंतरपीक म्हणून केले जाते. नारळमध्ये तसेच सुपारीच्या बागांमध्ये याची लागवड करता येणे शक्य आहे. काही शेतकरी याची मुख्य पीक म्हणूनही लागवड करतात.  

एकरी दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई होणार 

 कृषी क्षेत्रातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अळू लागवडीतून शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. कृषी तज्ञ सांगतात जर शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन केले तर त्यांना हिरव्या पानांचे (देठासहित) हेक्टरी 4 ते 5 टन आणि कंदाचे पाच ते सहा टन इतके उत्पादन मिळू शकते.

या उत्पादनाच्या आधारावर विचार केला असता शेतकऱ्यांना एकरी साधारणता दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. हे पीक पाच ते सहा महिन्यात तयार होते आणि याच पाच ते सहा महिन्यांच्या काळातच शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते.  

अळूच्या सुधारित जाती

भारतातील विविध राज्यांमध्ये अळूची लागवड केली जाते. महाराष्ट्रात देखील अळूची व्यावसायिक शेती केली जात आहे. या पिकाची लागवड बाराही महिने करता येणे शक्य आहे. देशातील विविध राज्यांमध्ये अळूच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली जात आहे.

मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कोकण हरितपर्णी या जातीच्या अळूची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. या जातीबाबत बोलायचं झालं तर काळपट जांभळ्या देठाची, मोठे रुंद त्रिकोणी पान असलेली व भरपूर कंद येणारी जात ही जात महाराष्ट्रातील कोकण सहित सर्वच भागांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे.

मात्र राज्यात अळूची व्यावसायिक लागवड फारच कमी प्रमाणात होते. या जातीपासून पाने आणि कंद पकडून हेक्टरी दहा टन पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!