चर्चा तर होणारच! शेतकऱ्याने कांद्याच्या शेतात उभारली अनोखी गुढी; बळीच राज्य येऊ दे! म्हणतं शासनाकडे घातलं साकडं

Ajay Patil
Published:

Agriculture News : गेल्या अनेक वर्षांपासून जगाचा पोशिंदा बळीराजा नैसर्गिक संकटांमुळे संकटात सापडला आहे. याही वर्षी याची प्रचिती आपल्याला येत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. या निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकीकडे नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. बळीराजा मात्र आर्थिक संकटात असताना शासनाकडून बळीराजाच्या तोंडाला आश्वासना देऊन पाने पुसली जात आहेत. शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा असताना शासनाकडून केवळ घोषणाबाजी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी लावला आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या ‘त्या’ 14 बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला ! 27 ला उमेदवारी अर्ज, ‘या’ दिवशी पार पडणार निवडणूक; आता…

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिक शेतकरी बांधव ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरत आहेत. शासनाकडून मात्र याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. विशेषता कांदा बाबत शासनाचे अनैतिक धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या पुढ्यात असलेल्या या संकटांच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे निमित्त साधून येवला तालुक्यातील पारेगाव येथील वैभव खिल्लारे या शेतकऱ्याने आपल्या कांद्याच्या शेतात गुढीची उभारणी केली आहे. ही गुढी उभारून या शेतकऱ्याने बळीचे राज्य येऊ दे अशी आपली मनोकामना बोलून दाखवली असून पिकाला हमीभाव मिळू दे अशी मागणी देखील केली आहे. आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरी झाला आहे. मात्र या सणासुदीच्या दिवसात निसर्गाच्या दुष्टचक्राने बळीराजाचा तोंडी आलेला घास हिरावला आहे.

हे पण वाचा :- Breaking News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ लाख रेशन कार्ड धारकांना मिळणार ‘हा’ मोठा लाभ ! 1…

बाजारात शेतमालाला दगणने दर मिळत असल्याने शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडला आहे. यामुळे गुढीपाडव्याचा सण कसा गोड होणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी, कुंभकर्ण झोपेत निजलेल्या शासनाला जागं करण्यासाठी या शेतकऱ्याने कांद्याच्या वावरात अनोख्या गुढीची उभारणी केली आहे.

गुढीला कांद्याची माळ, द्राक्ष, मिरच्यांच्या माळा घालत अनोखे संदेश फलक लावत या तरुण शेतकऱ्याने गुढी उभारली आहे. कांद्याला हमीभाव द्या, पावसाने पीक झाले उध्वस्त, शेतमालाला भाव द्या, असे अनोखे फलक गुढीला लावून शासनाचे लक्ष वेधण्याचा हा छोटासा प्रयत्न या शेतकऱ्याच्या माध्यमातून आज करण्यात आला आहे. यामुळे सध्या या अनोखी गुढीची परिसरात चर्चा पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा :- तुम्हालाही सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाही का? मग ‘या’ ठिकाणी करा तक्रार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe