Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगरच्या ‘त्या’ 14 बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला ! 27 ला उमेदवारी अर्ज, ‘या’ दिवशी पार पडणार निवडणूक; आता शेतकरीही निवडणुक रिंगणात

Ahmednagar APMC Election : अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता, जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे या चौदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज चालवल जात आहे. अशा परिस्थितीत या बाजार समितीमध्ये निवडणुकीचा बिगुल केव्हा वाचणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान आता या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. यासाठीच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीसाठी 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज इच्छुकांना सादर करता येणार आहे. तसेच प्रत्यक्ष निवडणूक 28 एप्रिल रोजी होणार आहे म्हणजेच 28 एप्रिलला मतदान घेतलं जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधील निवडणुकीकडे नागरिकांचे वेध लागलेले होते त्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत.

हे पण वाचा :- Breaking News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ लाख रेशन कार्ड धारकांना मिळणार ‘हा’ मोठा लाभ ! 1 एप्रिल पासून होणार…

निश्चितच आता बाजार समितीमध्ये राजकीय धुराळा येत्या काही दिवसात पहावयास मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून नगर सहकार विभागाला काल म्हणजे 21 मार्च 2023 रोजी या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत. या आदेशामध्ये बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निश्चितीबाबतही कळविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

आता जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी या पत्रान्वये 27 मार्च रोजी कार्यक्रम जाहीर करणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. 27 मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रोसेस सुरू होणार असून 3 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. म्हणजेच तीन एप्रिल उमेदवारी दाखल करण्याची शेवटची दिनांक या ठिकाणी राहणार आहे.

हे पण वाचा :- तुम्हालाही सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाही का? मग ‘या’ ठिकाणी करा तक्रार

दाखल झालेल्या अर्जांची पडताळणी होईल आणि 6 एप्रिल रोजी पात्र ठरलेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच अर्ज सादर केलेल्या उमेदवाराला जर निवडणुकीतून माघार घ्यायची असेल तर 20 एप्रिल रोजीपर्यंत संबंधित उमेदवाराला माघार घेता येणार आहे. यानंतर 21 एप्रिल रोजी उमेदवारांची यादी, माघार घेतलेल्यांची यादी आणि चिन्ह वाटप केलं जाणार आहे.

यानंतर मग 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष इलेक्शन होणार आहे. यानंतर मग दोन किंवा तीन दिवसात या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. खरं पाहता अहमदनगर जिल्ह्यातील या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत व सोसायटी मतदार संघातून शेतकर्‍यालाही उमेदवारीची संधी राहणार असल्याने ही निवडणूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

हे पण वाचा :- रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार तिकीट दरात मोठी सवलत, पहा