Agro Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिना बळीराजासाठी खास राहणार आहे. पुढल्या महिन्यात दोन योजनांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. नगरपंचायत तसेच नगर परिषदेच्या निवडणुकीआधी राज्यातील लाडक्या बहिणींना शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापोटी 1500 रुपयांचा लाभ देण्यात आला होता.

यानंतर काल झालेल्या महापालिका मतदानाच्या आधी देखील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला. आता पुढल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र राज्य शासन पुन्हा एकदा शेतकऱ्यांना खुश करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कृषी विभागाकडून या योजनेअंतर्गत निधी वितरणासाठी वित्त विभागाकडे पैशांची मागणी करण्यात आली असून या संदर्भातील प्रस्ताव अलीकडेच सादर झाला आहे. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर झाला की लगेचच राज्यातील शेतकऱ्यांना नमकीसाणाचा हप्ता मिळणार अशी शक्यता आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्माननिधी योजनेच्या बरोबरच पीएम किसान चा पुढील हप्ता देखील मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात दोन हजार रुपयांचा लाभ मिळाला होता.
आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. योजनेचा 22 वा हप्ता पुढील महिन्यात पात्र शेतकऱ्यांना मिळू शकतो अशी माहिती आहे.
दोन्ही योजनांचे पैसे कदाचित वेगवेगळ्या तारखांना जमा होतील पण पुढील महिन्यात दोन्ही योजनांचे पैसे 100% शेतकऱ्यांना मिळतील असं म्हटलं जात आहे. यामुळे आता पुढल्या महिन्यात खरंच राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.













