अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आणखी एक नवा हायवे ! 15 हजार कोटी खर्चाचा ‘हा’ महामार्ग जिल्ह्याच्या विकासासाठी ठरणार पूरक

पुणे - छत्रपती संभाजीनगर महामार्ग प्रकल्प अहिल्यानगर मधून जाणार असून या प्रकल्पाचा जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका राहणार आहे. या पंधरा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे पुणे ते छत्रपती संभाजी नगर यादरम्यानचा प्रवासाचा कालावधी पाच तासांनी कमी होणार आहे.

Published on -

Ahilyanagar Highway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्याला आणखी एक नवा महामार्ग मिळणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन महामार्ग विकसित होणार असून हा मार्ग अहिल्या नगर जिल्ह्यातून जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा संसदेत पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग प्रकल्पाची माहिती दिली आहे.

खरेतर गेल्या चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये या महामार्ग प्रकल्पाबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी हा नवा महामार्ग तयार करण्यासाठी सध्याच्या महामार्गालगत जमिनीचे संपादन करावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाबाबत संसदेत माहिती दिली असून यामुळे या प्रकल्पाचे काम आगामी काळात सुरू होणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

नक्कीच या महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू झाले तर पुणे ते छत्रपती संभाजी नगर हा प्रवास वेगवान होणार असून हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार असल्याने जिल्ह्यातील विकासाला देखील यामुळे चालना मिळणार आहे. या महामार्ग प्रकल्पासाठी केंद्रातील सरकारकडून 15000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून सध्या या प्रकल्पाचा आराखडा तयार केला जातोय.

या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या स्थितीला अंतिम टप्प्यात असून लवकरच हा आराखडा तयार होईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. पुणे आणि छत्रपती संभाजी नगर या दोन्ही शहराच्या मधोमध अहिल्यानगर शहर येते.

यामुळे हा महामार्ग अहिल्यानगर मधून किंवा शहराजवळून जाण्याची दाट शक्यता आहे. हा महामार्ग प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असल्याने हा महामार्ग शहरातून गेला नाही तरी शहराजवळून शंभर टक्के जाईल आणि साहजिकच याचा जिल्ह्याला फायदा होणार आहे.

या महामार्ग प्रकल्पामुळे अहिल्यानगर मधील नागरिकांना पुण्याला आणि छत्रपती संभाजी नगरला जलद गतीने पोहोचत आहे शक्य होईल आणि यामुळेच हा महामार्ग प्रकल्प छत्रपती संभाजी नगर इतकाच अहिल्यानगर शहरासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे.

हेच कारण आहे की या महामार्ग प्रकल्पाबाबत नगरकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अहिल्यानगर बाबत बोलायचं झालं तर नगर हे उत्तर आणि दक्षिण भारताला रस्ते मार्गाने जोडणारे मध्यबिंदू आहे. नगरहून उत्तरेकडे जायचे असल्यास नगर – मनमाड हायवे आणि छत्रपती संभाजी नगर हायवे उपलब्ध आहे.

दक्षिणेकडे जायचे असल्यास नगर – दौंड रस्ता आणि नगर – सोलापूर रस्ता हे दोन महत्त्वाचे महामार्ग आहेत. कल्याण – विशाखापटनम हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा आपल्या नगर मधून जातो. दरम्यान आता पुणे – छत्रपती संभाजीनगर हा हायवे नगर मधून जाईल आणि याचाही जिल्ह्याला फायदा होणार आहे.

पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर पंधरा हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होणार असा दावा केला जातोय. सध्या या प्रवासासाठी जवळपास सात तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. म्हणजेच हा प्रस्तावित महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचे एकूण पाच तास वाचणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe