Ahilyanagar News : राज्यातील गिर्यारोहकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही ट्रेकिंग करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर आता रोपवे विकसित केला जाणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसुबाई शिखरावर हा रोपवे तयार होणार असून यासाठी आता कोट्यावधी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे.

खरे तर कळसुबाई हे अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर असून या ठिकाणी दररोज पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात.
दरम्यान, पर्यटकांच्या सुविधेसाठी आता या ठिकाणी रोपवे तयार होणार असून यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना मिळणार असून पर्यटकांच्या दृष्टीने हा निर्णय फारच फायद्याचा ठरेल असा विश्वास व्यक्त होतोय.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रकल्पासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नुकतीचं प्रसार माध्यमांना दिलेली आहे. दरम्यान आता आपण या प्रकल्पामुळे नेमका काय फायदा होणार ? याबाबत माहिती पाहणार आहोत.
कुठे आहे कळसुबाई शिखर
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर वसलेले आहे. हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात असले तरी देखील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून रस्ते मार्गाने ते फारच जवळ आहे.
घोटी-भंडारदरा रस्त्यावर बाकी गावापासून कळसूबाई शिखराकडे जाण्याचा मार्ग आहे. या देशातील सर्वाधिक उंचीच्या शिखरांमध्ये समाविष्ट असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर भेट देण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी येथे येतात.
पण जे लोक ट्रेकिंग करतात ते पर्यटक पायी चालून वर शिखरापर्यंत जातात. पण, ज्यांना या शिखरावर पायी चालून भेट देणे शक्य होत नाही, त्यांना रोपवेमुळे अर्थातच रज्जुमार्गामुळे शिखरापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.