अहिल्यानगरला मिळणार नवीन सहापदरी हायवे ! डीपीआरचे काम सुरू, 6 महिन्यात सुरु होणार प्रकल्पाचे काम

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात राज्यात अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत, तसेच अजूनही अनेक रस्त्यांचे कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच एका नव्या सहा पदरी रस्त्याची भेट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एका नव्या रस्त्याची घोषणा केली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मंत्री नितीन गडकरी हे नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनासाठी नगरमध्ये आले होते. गडकरी यांच्या हस्ते नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजनही झाले.

दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी जिल्ह्याला लवकरच एका नव्या रस्त्याची भेट मिळणार असल्याची माहिती दिली आहे. गडकरी यांनी धुळे अहिल्यानगर या रस्त्याच्या कामासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

गडकरी यांनी काय माहिती दिली ?

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमा वेळी धुळे – अहिल्यानगर रस्त्याबाबत मोठी अपडेट दिली. यावेळी त्यांनी लवकरच धुळे अहिल्यानगर रस्त्याचा डीपीआर तयार होणार असल्याची माहिती दिली.

ते म्हणालेत की धुळे-अहिल्यानगर या रस्त्यावर मालेगाव-मनमाड-कोपरगाव या भागाची लांबी 76 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा एक बीओटी प्रोजेक्ट होता. म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या धर्तीवर या रस्त्याचे काम करण्यात आले होते.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने या रस्त्याला नॅशनल हायवे जाहीर केले नाही. यामुळे केंद्राला या रस्त्याचे काम करताना अडचण येत होती. नितीन गडकरी म्हणालेत की राज्य सरकारने या रस्त्याला एनएच अर्थातच नॅशनल हायवे चा दर्जा दिला नाही आणि यामुळे या रस्त्याच्या कामाला अडचण येत होती.

मात्र आता या BOT तत्त्वावर तयार करण्यात आलेला या रस्त्याचा कालावधी संपलेला आहे. यामुळे आता धुळे – अहिल्यानगर या रोडचा डिपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते म्हणालेत की, सध्या आम्ही हा रस्ता चार पदरी करण्याचा विचार करत आहोत.

पण, जर सहा पदरी रस्ता करण्यासाठी जर आवश्यक जागा मिळाली तर आम्ही हा रस्ता सहा पदरी सुद्धा करू असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. म्हणजेच हा रस्ता सहा पदरी बनवण्याचा विचार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी जाहीर करणे.

एवढेच नाही तर याचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमावेळी व्यक्त केला. मनमाड ते धुळे हा रस्ता चौपदरीकरणाऐवजी सहा पदरी करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली. तसेच, हा रस्ता चार पदरी ऐवजी सहा पदरी झाला तर पुढील 25 ते 50 वर्षे अडचण येणार नाही, असे सुद्धा गडकरी यांनी यावेळी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe