अहिल्यानगर : जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय ! जिल्ह्यातील 11 गड किल्ले ‘या’ तारखेपर्यंत अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा असा अहिल्यानगर जिल्हा आणि या जिल्ह्यात येणारे 11 संरक्षित गडकिल्ले याच जिल्ह्यात येतात. मात्र या गडकिल्ल्यांवर सध्या जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण चिंतेचा विषय असून याच अतिक्रमणाच्या बाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मोठा निर्णय घेत हे अतिक्रमण 31 मे 2025 पर्यंत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Tejas B Shelar
Published:

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गडकिल्ले आता अतिक्रमण मुक्त होणार आहेत आणि यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी एक विशेष मोहीम हाती घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय. खरे तर केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेले एकूण 109 गड किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत अन यातील तब्बल 11 गडकिल्ले हे एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा असा अहिल्यानगर जिल्हा आणि या जिल्ह्यात येणारे 11 संरक्षित गडकिल्ले याच जिल्ह्यात येतात. मात्र या गडकिल्ल्यांवर सध्या जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण चिंतेचा विषय असून याच अतिक्रमणाच्या बाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मोठा निर्णय घेत हे अतिक्रमण 31 मे 2025 पर्यंत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

खरे तर शिव-शंभुभक्तांच्या माध्यमातून, विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून राज्यातील गडकिल्ले अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात आहे. जिल्ह्यातील गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विविध संघटना पाठपुरावा करत आहेत.

दरम्यान आता हीच बाब विचारात घेऊन जिल्ह्यातील अकरा संरक्षित गडकिल्ले 31 मे पर्यंत अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे अन यासाठी आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या अनुषंगाने कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर असणारे अतिक्रमणांचे सर्वेक्षण व माहिती संकलन संबंधित विभागांनी सुरू केले आहे. एवढेच नाही तर गडकिल्ल्यांशिवाय आणखी काही संरक्षित वास्तू विविध विभागांच्या ताब्यात आहेत. त्याची सुद्धा माहिती तसेच तेथील अतिक्रमणांच्या माहितीचे सुद्धा संकलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती आता समोर आली आहे.

तसेच, गड- किल्ल्यांच्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच झाली आहे, ही महत्त्वाची बैठक अहिल्यानगर मध्ये झाली आणि या बैठकीवेळी ३१ मेपर्यंत सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले अन त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवरील फक्त अतिक्रमणाच काढले जाणार नाही तर लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून गड किल्ले स्वच्छ करण्यासाठी देखील विशेष मोहीम राबवली जाणार आहे. गड किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष सुविधा सुद्धा तयार केल्या जाणार आहेत.

नक्कीच अहिल्या नगर जिल्हाधिकारी महोदयांनी हा जो निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे गड किल्ल्यांचे संवर्धन होणार आहे, यामुळे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा सुद्धा जोपासला जाणार आहे. दरम्यान आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या 11 गडकिल्ले अतिक्रमण मुक्त होणार याची माहिती पाहूयात.

हे 11 किल्ले होणार अतिक्रमणमुक्त

निजामशाह कालीन भुईकोट किल्ला
यादवकालीन हरिश्चंद्रगड (अकोले)
मराठ्यांनी मोगलांविरुध्द अखेरची लढाई जिंकलेला खर्डा किल्ला (जामखेड)
संभाजी महाराजांना कैदेत ठेवलेला बहादूरगड (श्रीगोंदे)
शिवाजी महाराजांनी जिंकलेला रतनगड
सह्याद्रीच्या डोंगररांगातील कुलंग
शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतलेला पट्टा किल्ला (विश्रामगड, अकोले)
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराजवळ असलेला कळसूबाई किल्ला
अलंग किल्ला
गिर्यारोहण्यासाठी प्रसिद्ध मदन किल्ला
कावनई किल्ला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe